MPSC Result : एमपीएससीचा निकाल वादाच्या भोवऱ्यात, मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Jun 22, 2020 | 1:18 PM

नुकताच जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे (Vinod Patil object MPSC result).

MPSC Result : एमपीएससीचा निकाल वादाच्या भोवऱ्यात, मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

औरंगाबाद : नुकताच जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे (Vinod Patil object MPSC result). मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी एमपीएससीच्या निकालात अनियमितता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून निकाल पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एमपीएससी निकालाचा पेच भविष्यात वाढणार असल्याचं दिसत आहे.

आयोगाने एमपीएससीच्या निकालात जुन्याच अधिकाऱ्यांची त्याच पदावर निवड केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या निकालात जवळपास 30 अधिकाऱ्यांना नव्या निकालात जुन्याच ठिकाणी नियुक्ती दिल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे, “एमपीएससीच्यावतीने 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याला नवे अधिकारी मिळाले. परंतू यात एक नैराश्य आणणारी बाब म्हणजे यातील 30 पेक्षा अधिक अधिकारी राज्य सरकारच्या सेवेत रुजू आहेत. या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा 2019 च्या लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षांमध्ये भाग घेतला आणि उत्तीर्ण झाले. मात्र, जे अधिकारी आधी उपजिल्हाधिकारी होते, ते पुन्हा उपजिल्हाधिकारी झाले. जे तहसिलदार होते पुन्हा तहसिलदार झाले. यामुळे राज्य सरकारचा वेळ वाया गेला. परीक्षेचा खर्च वाया गेला. यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.”

“परीक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पुन्हा अशा प्रकारे एकाच पदाकरता परीक्षा देऊन शासनाची दिशाभूल न करणे ही त्यांची नैतिकता आहे. परंतू तसे घडले नाही. आधीच अनेक निकाल उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्तरावर याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आदेश द्यावेत. तात्काळ हा निकाल सुधारित व्हावा. यामध्ये 30 पेक्षा अधिक नव्या युवकांना अधिकारी होण्याची संधी मिळेल. उच्च पदावर जाण्याची संधी मिळेल. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या :

UPSC Revised Timetable | यूपीएससी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा, यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?

पुण्यात स्पर्धा परीक्षार्थीला घर खाली करण्याचा तगादा, घर मालकावर गुन्हा दाखल

पुणे : आरक्षण मिळत नसल्याने MPSC च्या जाहिरातीवर धनगर, वंजारी समाजाचे विद्यार्थी नाराज

Vinod Patil object MPSC result