विरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Sep 27, 2020 | 11:43 PM

या कारवाईत 152 सक्शन पंप, 1650 ब्रास रेती, 230 बोटी, 1 जेसीबी असा सुमारे आठ कोटीचा रेतीसाठा जप्त केला आहे.

विरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त
Follow us on

विरार : कोरोना काळातील लॉकडाऊनचा फायदा उचलत अवैध रेतीचे उत्खनन करुन (Virar Illegal Sand Excavation), पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या रेती माफियावर आज महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली. विरारच्या खार्डी आणि खाणीवडे रेती बंदरावर मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई केली आहे. या कारवाईत 152 सक्शन पंप, 1650 ब्रास रेती, 230 बोटी, 1 जेसीबी असा सुमारे आठ कोटीचा रेतीसाठा जप्त केला आहे. या कारवाईत अज्ञात रेती माफियांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत (Virar Illegal Sand Excavation).

विरार पूर्वेतील खार्डी, खानिवडे, वैतरणा, उसगाव, नारंगी, कोशिंबे यासह अन्य रेती बंदरे आहेत. या सर्वच रेती बंदरावर रेती उपसा करण्यास न्यायालयाची बंदी आहे. पण कोरोना काळात सर्वच यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन मागच्या दोन महिन्यापासून खुलेआम रेतीचे उत्खनन सुरु केले होते. याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे आणि वसईचे प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांना मिळताच पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत खार्डी आणि खाणीवडे रेती बंदरावर मोठ्या फोजफाट्यासह आज मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईत खार्डी बंदरातून 750 ब्रास रेती, 1 जेसीबी, 80 बोटी आणि 50 सक्शन पंप असा सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर खानिवडे बंदरातून 850 ब्रास रेती, 102 सक्शन पंप, 150 बोटी असा सुमारे पाच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Virar Illegal Sand Excavation

संबंधित बातम्या :

ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

‘माल’ म्हणजे ‘ड्रग्ज’ नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल: उज्ज्वल निकम