ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

दारुचे व्यसन आणि मधुमेहाच्या आजाराने त्रस्त असल्याने निवृत्त अधिकारी मोहम्मद सादिक शेख यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

ठाणे : प्रादेशिक परिवहन विभागातून कार्यमुक्त झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहम्मद सादिक शेख यांनी ठाण्यातील राहत्या घरी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. (Thane Retired RTO Police officer committed Suicide)

राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. निवृत्त अधिकारी मोहम्मद सादिक शेख वैफल्यग्रस्त झाल्याचे बोलले जाते. दारुचे व्यसन आणि मधुमेहाच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शेख यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. दोन्ही मुली विवाहित आहेत. शेख यांची एक मुलगी अभियंता असून दुसरी मुलगी डॉक्टर आहे. तर मुलगाही अभियंता आहे. तो त्यांच्यासोबत ठाण्यातील घरी राहत होता. तर शेख यांची पत्नी एक वर्षापासून नेरळमध्ये वास्तव्यास होती.

मोहम्मद सादिक शेख हे ठाण्याच्या कॅसल मिल परिसरातील विकास कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. मोहम्मद साजिद शेख हे प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना दारुचे व्यसन जडले.

दारुचे व्यसन जडलेल्या शेख यांनी वैफल्य आणि नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. राबोडी पोलिसांनी घटनास्थळावरुन शेख यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त केले असून ते अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या 

आधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या

तू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे ‘खयाली पुलाव’, वादावादीतून तरुणाची हत्या

(Thane Retired RTO Police officer committed Suicide)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *