सांगलीत वीज पुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

| Updated on: Aug 13, 2019 | 8:05 PM

बंद पडलेल्या ट्रान्सफार्मरची (डीपी) दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू (wire men death) झाला. संजय बाळासाहेब जाकले (वय 40, रा. खोची, ता. हातकणंगले) असं त्यांचं नाव आहे.

सांगलीत वीज पुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
Follow us on

सांगली : महापुराच्या तडाख्यात सांगली जिल्ह्यात वीजपुरवठाही (Sangli electricity) खंडित झालाय. हा वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरु केला जात आहे. पण हे काम करतानाच एका वायरमनचा (wire men death) मृत्यू झालाय. बंद पडलेल्या ट्रान्सफार्मरची (डीपी) दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू (wire men death) झाला. संजय बाळासाहेब जाकले (वय 40, रा. खोची, ता. हातकणंगले) असं त्यांचं नाव आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुधगाव (ता. मिरज) येथे ही घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही यांचंच सरकार, तरीही पाणी सोडलं नाही : संभाजी भिडे

जाकले हे आपल्या पत्नी, मुलांसह खोची येथे राहत होते. ते दुधगाव येथे वायरमन म्हणून काम करतात. दररोज ते खोचीतून दुधगावकडे ये-जा करुन नोकरी करत होते. दुधगाव येथे महापुराच्या पाण्याने ट्रान्सफार्मर बंद पडला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जाकले कामावर रुजू झाले. दुधगाव येथील शिवगोंडा पाटील यांच्या जमिनीत असलेला ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावर चढले होते. दुरुस्ती सुरु असताना त्यांचा विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते खाली कोसळले. यानंतर त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी ते मृत झाल्याचं घोषित केलं.

ब्लॉग : जलप्रलयाच्या अगोदर आणि नंतर…

महापुरानंतर सांगली आणि परिसरात आता जनजीवन सुरळीत करण्यावर भर दिला जातोय. काहींची घरं पडली आहेत, तर जनावरं दगावल्यामुळे रोगराईचीही भीती निर्माण झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान आहे. महावितरणने हे कामही हाती घेतलंय. पण मिरजेतील या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.