राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र हे दुर्दैवी आणि असंवैधानिक : यशोमती ठाकूर

| Updated on: Oct 13, 2020 | 9:11 PM

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ही दुर्दैवी आणि असंवैधानिक घटना असल्याची टीका महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र हे दुर्दैवी आणि असंवैधानिक : यशोमती ठाकूर
Yashomati Thakur
Follow us on

मुंबई : हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. मात्र आता ‘धर्मनिरपेक्षता’अंगीकारली आहे काय? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ही दुर्दैवी आणि असंवैधानिक घटना असल्याची टीका महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. (Yashomati thackur Criticized Governor Bhagatsinh Koshyari over Cm Uddhav thackeray Letter)

राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीने धार्मिक भूमिका घेणं अयोग्य आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ही दुर्दैवी आणि असंवैधानिक आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. तसंच राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असताना अशी मागणी करणं हे षडयंत्र तर नाही ना?, अशी शंकाही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केली.

दिल्लीत 8 जूनला, तर देशाच्या इतर भागात जून महिन्याच्या अखेरीस प्रार्थनास्थळे उघडली होती. पण त्यानंतर कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली नाहीत, असा दावा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला. त्यावर राज्यपालांनी जर कोरोना पसरणार नाही याची जबाबदारी घेतली तर मंदिरे खुली करायला हरकत नाही, असं त्या म्हणाल्या.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल पत्र ही दुर्दैवी आणि असंवैधानिक घटना आहे.राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीने धार्मिक भूमिका घेणं अयोग्य आहे. तसंच राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असताना अशी मागणी करणं हे षडयंत्र तर नाही ना?”

राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?” असा उपरोधिक सवाल विचारणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं.
“दिल्लीत 8 जूनला, तर देशाच्या इतर भागात जून महिन्याच्या अखेरीस प्रार्थनास्थळे उघडली होती. पण त्यानंतर कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली नाहीत. त्यामुळे कोव्हिड संबंधी काळजी घेण्याच्या सर्व सूचना देऊन प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा करावी” अशी विनंती राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना केली.

मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना तोडीस तोड प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर दिलं आहे. यामध्ये कोरोना ते कंगना अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांची कानउघणी केली आहे. दरम्यान, माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले.

(Yashomati thackur Criticized Governor Bhagatsinh Koshyari over Cm Uddhav thackeray Letter)

संबंधित बातम्या

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

‘राज्य सांभाळता येत नसल्याने उद्धव ठाकरेंचा तोल सुटतोय; राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का?’

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे