Ambani Family: आपली वर्षभराचीही कमाई नाही, अंबानी कुटुंबाच्या एका दिवसाचा खर्च तब्बल इतका; विस्फारतील डोळे
Ambani Family: जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबियांच्या यादीत अंबानी कुटुंब अव्वल स्थाना आहे. आंबानी कुटुंब कायम त्यांच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असते. समान्य माणसाची जेवढी कमाई होत नसते, त्यापेक्षा जास्त अंबानी कुटुंबिय दिवसाला खर्च करतात.

Ambani Family: जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबाची लाईफस्टाईल नेहमीच चर्चेचा विषय असते. प्रसिद्ध भारतीय उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब ज्या आलिशान जीवनशैलीचा अनुभव घेतात, ती पाहून प्रत्येकजण थक्क होतो. हे कुटुंब एका दिवसात नेमका किती खर्च करत असेल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एखदा सर्वसामान्य व्यक्ती वर्षाला जेवढी कमाई करत नसेल, तेवढे पैस अंबानी कुटुंब दिवसाला खर्च करतात. सांगायचं झालं तर, अंबानी कुटुंबिय जगातील सर्वात आलिशान ‘अँटिलिया’ बंगल्यात राहतात, त्यांच्या घराची किंमत जवळपास कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
अंबानी कुटुंबाकडे रोल्स-रॉयस, बेंटले, फेरारी आणि मर्सिडीज-बेंझ यांसारख्या शेकडो आलिशान गाड्या आहेत. अंबानी कुटुंब महागड्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि त्यांच्या देखभालीवर मोठी रक्कम खर्च केली जाते. रिपोर्टनुसार, त्यांच्या ड्रायव्हर्सचा पगार 1.5 लाख ते 2 लाख रुपयांच्या दरम्यान असतं. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना कोट्यवधी रुपये किमतीचं एक खाजगी जेट भेट दिलं होते. या जेटच्या आणि कुटुंबाच्या हेलिकॉप्टर्सच्या देखभालीसाठी दररोज लाखो रुपये खर्च येतात.
नीता अंबानी कायम त्यांच्या शाही अंदाजामुळे चर्चेत असतात. असं देखील म्हटलं जातं की, नीता अंबानी मुलांना आणि सुनांना कोट्यवधी रुपयांचे दागिने देखील भेट म्हणून देतात, त्यांच्या दागिन्यांची किंमत जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. अंबानी कुटुंबियांकडे जगातील सर्वात बेस्ट शेफ काम करतात. हे शेफ भारतीय आणि परदेशी पदार्थ बनवतात. किचन स्टाफ आणि शेफचं वेतन लाखो रुपयांच्या घरात आहे.
सिक्योरिटीवर कोट्यवधींचा खर्च
अंबानी कुटुंबाची सिक्योरिटी नेहमीच अत्यंत उच्च दर्जाची राखली जाते. त्यांच्या संरक्षणासाठी एनएसजी कमांडो आणि विशेष प्रशिक्षण घेतलेले सुरक्षा रक्षक तैनात असतात; केवळ सुरक्षेवरच दररोज कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, अंबानींचं निवासस्थान असलेल्या ‘अँटिलिया’मध्ये कार्यरत असलेल्या 600 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनासाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्च होतात; याचाच अर्थ असा की, केवळ कर्मचाऱ्यांवरच दररोज लाखो रुपये खर्च केले जातात.
एकूण खर्चाचा अंदाज
घराची देखभाल, वाहनांचा खर्च, सिक्योरिटी, कर्मचाऱ्यांचे पगार, खाजगी जेट आणि दैनंदिन लाईफस्टाईलचा खर्च यांचा विचार करता, अंबानी कुटुंबाचा रोजचा खर्च कोटींच्या घरात जातो असं म्हटलं जातं. म्हणूनच, सामान्य माणसाला अंबानी कुटुंबियांची लाईफस्टाईल एखाद्या स्वप्नासारखी वाटते.