केसांना गरम तेलाने मसाज करताय? फायद्यापेक्षा नुकसानच अधिक

| Updated on: Jan 17, 2022 | 8:55 AM

गरम तेलाने केसांची मसाज करणे केसांचे आरोग्य धोक्यात टाकू शकते. गरम तेलाने केस खराब होण्याची शक्यता असते. शिवाय डोक्यात खाज, कोंडा आदी समस्या निर्माण होतात. केस कमकुवत होत केसगळती होउ शकते.

केसांना गरम तेलाने मसाज करताय? फायद्यापेक्षा नुकसानच अधिक
केसांची काळजी
Follow us on

स्त्रीयांचं सौंदर्य हे तिच्या केसांमध्ये असतं, अस आपण नेहमी म्हणतो. आधुनिक युगात केसगळती, केसांतील कोरडेपणा या समस्या सामान्य आहेत. केसांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी अनेकांकडून विविध उपाय योजना केल्या जात असतात. त्यांची निगा राखली जाते. त्याचाच एक भाग म्हणून अनेकांकडून गरम तेलाने (hot oil) केसांची मसाज (massaging) करण्याला प्राधान्य देण्यात येत असते.

केसांना फायदे कमी मात्र नुकसान (damage) अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केसांना सुंदर आणि ‘हेल्दी’बनवण्यासाठी तुम्हीही गरम तेलाने मसाज करत असाल तर काळजी घ्या. कारण यामुळे केसांना पोषक घटक मिळण्याऐवजी त्यांचे आरोग्य धोक्यात टाकत आहात. केस नितळ आणि मजबूत होण्याऐवजी ते हळूहळू खराब होऊ लागतात. केसांना अधूनमधून कोमट तेल वापरणे फायदेशीर असले तरी गरम तेल फायदे देण्याऐवजी नुकसानच करते.

1) पोषकतत्वे होतात नष्ट

केसांची गरम तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया वाढत असली तरी, गरम केल्यावर तेलातील सर्व पोषकतत्वे नष्ट होतात. त्यामुळे केसांना तेल न तापवता किंवा कोमट केल्यावर जे पोषण मिळते ते मिळत नाही. त्यामुळे गरम तेलाचा वापर केसांसाठी न करणेच योग्य ठरते.

2) खाज आणि कोंड्याची समस्या

गरम तेलाने केसांची मसाज केल्याने कालांतराने डोक्यात खाज येणे, कोंडा यांसारख्या समस्या निर्माण होउ शकतात, डोक्याचे केस गरम तेलाने अडकत असतात, त्यामुळे टाळूमध्ये आपणास कोरडेपणाची समस्या जाणवू लागते. गरम तेल आपल्या टाळूतील नैसर्गिक ओलावा काढून टाकत असल्याचेही निदर्शनात आले आहे.

3) केस गळतीची समस्या

गरम तेलामुळे केस गळतीच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. डोक्यात कोंडा आणि खाज येण्याबरोबरच टाळू कोरडे पडल्याने केस गळणेही सुरू होते. गरम तेलाच्या मसाजने केसांची मुळ ही कमकुवत होत असतात. त्यामुळे अंघोळ करताना, केस विंचरताना तसेच इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात केस गळती होत असते. यामुळे प्रसंगी टकलेपणाच्या समस्येलाही आपणास सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे गरम तेल हे तुमच्या केसांना वाढवण्याऐवजी घटवण्याचे काम अधिक करते.

4) अॅलर्जीचा धोका

गरम तेलाने केसांची मसाज केल्याने अनेकांना यातून अॅलर्जी होण्याचा धोका निर्माण होत असतो. ही समस्या काहींना जास्त तर काहींना कमी असते. बहुतेक लोकांची टाळू अधिक संवेदनशील असते. अशा वेळी त्यांना अॅलर्जीचा धोका अधिक संभवतो. गरम तेलामुळे केस दाट होण्याऐवजी विरळ होत असतात. त्याप्रमाणे केसांमधील उपयुक्तमुल्य यातून कमी होण्याचा धोका असतो.

संबंधित बातम्या : 

तिळाच्या चिक्कीचे सहा फायदे ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त, हिवाळ्यात ऊर्जेचा स्त्रोत

तुमच्याद्वारे सुद्धा चुकून खाल्ले जात आहे प्लास्टिक? जाणून घ्याल तर घ्याल काळजी!!