अशी पाच लक्षणे जी सांगतात तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता…

शरीरात ज्यावेळी रक्त कमी होते, तेव्हा आपणास ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवत असते. यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरातील ‘ब्लड सर्कुलेशन’ देखील कमी होऊ शकते.

अशी पाच लक्षणे जी सांगतात तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता...
रक्तीची कमतरता
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 10:21 AM

आपल्या शरीरात रक्ताचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुठल्याही आजाराचे निदाने हे प्रामुख्याने रक्तनमुन्यांच्या माध्यमातूनच होत असते. मानवी शरीरात रक्तपातळी ठरावीक मर्यादेत असणे अत्यंत आवश्‍यक असते. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होउ शकतात. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे (lack of blood) अनेकदा थकवा(tired) जाणवणे, अशक्तपणा आणि चक्कर येणे या समस्या जाणवू शकतात.

कमी हिमोग्लोबिनची (hemoglobin) ही लक्षणे म्हणता येतील. रक्ताच्या कमतरतेमुळे, तुम्हाला ‘अॅनिमियाच्या’ (anemia) समस्येलाही तोंड द्यावे लागू शकते. याचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक आढळते. हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य हे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणे हे असते. रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. झी न्यूजने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.

लोहाची कमतरता

आपल्या दैनंदिन आहारात लोहाचा समावेश असणे अत्यंत आवश्‍यक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. महिलांत गर्भधारणेच्या वेळी शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी होऊ शकते. मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव हे याचे कारण सांगता येते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास बाहेरील, तेलकट, तुपकट, तिखट आहार टाळावा. जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळेही ही समस्या निर्माण होउ शकते. यावर उपाय म्हणून आपल्या रोजच्या आहारात जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमचा समावेश असावा.

याकडे दुर्लक्ष नको

रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक बदल होत असतात. तसेच काही प्रमुख लक्षणेदेखील आपणास जाणवू शकतात. खूप थकवा येणे, त्वचा पिवळी पडणे, शरीरात उर्जा नसल्यासारखे वाटणे ही सर्व हिमोग्लोबिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास हृदयाचे ठोके जलद होण्याची समस्या देखील असू शकते. यामुळे आपणास श्वास घेण्यास त्रास होउ शकतो.

शरीरात रक्त कमी होते, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता देखील असते. यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो तसेच शरीराला जडपणा येतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्त परिसंचरण देखील कमी होऊ होते. कमी हिमोग्लोबिनमुळे डोकेदुखी आणि छातीत दुखण्याची समस्या जाणवू शकते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे संधिवात, कर्करोग आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. लहानसहान काम केले तरही मोठ्या प्रमाणात दमल्यासारखे वाटत असते. ही लक्षण तुम्हाला जाणवत असतील तर लागलीच तज्ज्ञांचा सल्ला घेउन त्यावर उपचार घ्या.

याचा आहारात समावेश हवा

जर तुम्हालाही हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या असेल तर रोजच्या आहारात लोहाचे प्रमाण वाढवा. रोजच्या आहारात मांस, मासे, सोयाबीन, अंडी, नट, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर, बीट यांसारख्या गोष्टींचा समावेश करा. यासोबतच ‘व्हिटॅमिन सी’ची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्षे, लिंबू, संत्री, आंबा, किवी ही फळे खावीत.

(टीप : सदर लेख उपलब्ध माहितीवर आधारीत आहे, यास कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

संबंधित बातम्या : 

Health Tips | मासे खावे वाटतात, आहारात जास्त समावेश करता ? मग होणारे संभाव्य आजार नक्की वाचा

Health | तुम्हाला ही झोपताना छातीशी उशी घेण्याची सवय? जाणून घ्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.