AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याद्वारे सुद्धा चुकून खाल्ले जात आहे प्लास्टिक? जाणून घ्याल तर घ्याल काळजी!!

तुमच्याद्वारे सुद्धा चुकून खाल्ले जात आहे प्लास्टिक? या प्रश्न वाचताच तुम्हाला आश्चर्य वाटू शकते परंतु हे सत्य आहे कि प्रत्येक दिवशी खाण्यापिण्यात सोबतच आपण प्लास्टिक सुद्धा आपल्या शरीरामध्ये काही प्रमाणामध्ये ग्रहण करत आहोत. एका संशोधनानुसार ही गोष्ट प्रमाणित झालेली आहे.

तुमच्याद्वारे सुद्धा चुकून खाल्ले जात आहे प्लास्टिक? जाणून घ्याल तर घ्याल काळजी!!
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 12:44 PM
Share

मुंबई : (How Much Plastic Do You Eat Daily): प्रत्येक दिवशी आपण किती अन्न पदार्थ खातो याचे उत्तर आपण सहजरीत्या देऊ शकतो. अंदाजे 12-15 चपात्या किंवा थोडासा भात त्याचबरोबर अन्य काही पदार्थ चवीला आपण सेवन करत असतो. जेव्हा तुम्हाला विचारले जाते की तुम्ही दिवसभरातून किती प्लास्टिक खाता तर या प्रश्नाचे उत्तर क्वचितच तुम्ही देऊ शकाल. हा प्रश्न ऐकताच तुम्ही म्हणाल की हा काही प्रश्न आहे? पण हे खरे आहे ,आपण दिवसेंदिवस प्लास्टिक(Plastic) खात चालले आहोत. खाण्यापिण्या सोबतच आपण श्‍वास घेताना सुद्धा आपण आपल्या शरीरामध्ये प्लास्टिक आत मध्ये घेत आहोत. जे की भविष्यात आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी (Health) अत्यंत हानीकारक ठरणार आहे. आपल्या सर्वांना प्लास्टिकचे दुष्परिणाम माहितीच आहे. अनेकांचे जीव प्लास्टिक मुळे गेलेले आहेत तसेच प्लास्टिकचे लवकर विघटन सुद्धा नाही आणि म्हणूनच जगापुढे प्लास्टिकची खूपच मोठी समस्या बनलेली आहे म्हणूनच आज आपण नेहमी खाण्या-पिण्यासोबत प्लास्टिक सुद्धा खात आहोत का ?? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

15 ते 20 किलो प्लॅस्टि शरिरामध्ये

news.trust.org द्वारे गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार आपण 10 दिवसांमध्ये एक क्रेडिट कार्ड एवढे आपण प्लास्टिक खातो. दुधासोबत, सलाड सोबत कळत नकळत व्यक्ती दहा दिवसांमध्ये ग्राम प्लास्टिक खाऊन जाते. रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार शरीरामध्ये हवा पाणी आणि अन्नासोबतच प्लास्टिक सुद्धा आत शिरत आहे अश्यावेळी जर आपण संपूर्ण आयुष्याचा हिशोब केला गेला तर 15 ते 20 किलो प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जात आहे,असे जर निष्कर्ष निघाल्यास हैराण होण्यासारखे काहीच नाही..

इंटरनेशनल न्यूज एजेंसी रॉयटर्स नी डब्ल्यूडब्ल्यूएफ इंटरनेशनलचा आढावा

इंटरनेशनल न्यूज एजेंसी रॉयटर्स नी डब्ल्यूडब्ल्यूएफ इंटरनेशनल (WWF International) यांनी केलेल्या अभ्यासानुसार रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की एका महिन्यामध्ये आपण की 4 x 2 आकाराएवढा लीगो ब्रिक्स प्लास्टिक खातो. हे प्लास्टिक अन्नपदार्थ सोबत आपल्या पोटापर्यंत पोहोचते आणि आपल्या यामुळे पचनसंस्थेला भविष्यात नुकसान पोहचवते.

WWF यांनी केलेले संशोधन

जर आपल्याला प्रत्येक दिवसाबद्दल बोलायचे झाल्यास अशा वेळी WWF यांनी केलेले संशोधन आपल्याला सांगते की, आपण नेहमी 0.7 ग्रॅम वजन एवढे प्लास्टिक खाऊन जातो.एखादे बटन ज्याचे वजन अंदाजे 5 ग्रॅम असेल तर इतक्याच मात्रामध्ये आपण प्लास्टिक एका आठवड्यात खातो याचाच अर्थ असा की, 10 दिवसांत एखादे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड एवढे प्लास्टिक आपण सहज आरामात खाऊन जातो.

वर्षभरात कीती प्लॅस्टिकचे सेवन

न्यूज डॉट ट्रस्ट डॉट ऑर्ग यांच्या रिपोर्टनुसार या रिपोर्ट मध्ये असे सांगण्यात आले आहे की,एका वर्षात आपण एखाद्या फायर ब्रिगेड कर्मचारी जो डोक्यावर हेल्मेट घालतो त्या हेल्मेट इतक्या वजनाचे आपण प्लास्टिक आपण सेवन करत असतो. अश्या पद्धतीने जर आपण आयुष्यभराच्या अनुषंगाने हिशोब केला तर एकंदरीत आपण 20 किलो पेक्षा जास्त प्लास्टिकचे सेवन करतो.

संंबंधित बातम्या :

कोरोनाविरुध्द ‘व्हिटॅमिन डी’वरदानापेक्षा कमी नाही जाणून घ्या कसे ?

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, देशात 2 लाख 71 हजार नवे रुग्ण, 314 जणांचा मृत्यू

अशी पाच लक्षणे जी सांगतात तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.