Kareena Kapoor : करीना कपूर रोज रात्री पायांना तूप का लावते? न्यूट्रिशनिस्टने सांगितले अनेक फायदे!

Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या फिटनेस आणि सौंदर्याच्या रूटीनची सध्या चर्चा होत आहे. करीना रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तूप लावून मसाज करते. पायांना तूप लावण्याचे फायदे काय आहेत, जाणून घ्या.

Kareena Kapoor : करीना कपूर रोज रात्री पायांना तूप का लावते? न्यूट्रिशनिस्टने सांगितले अनेक फायदे!
| Edited By: | Updated on: Oct 17, 2026 | 9:53 PM

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या फिटनेस आणि त्वचेच्या निगेसाठी ओळखली जाते. ‘द ग्रेट इंडियन शो’मध्ये पती सैफ अली खानसोबत सहभागी झालेल्या करीना कपूरच्या रूटीनबाबत एक खास गोष्ट समोर आली आहे. करीना दररोज रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तुपाने मसाज करते. या शोमध्ये सैफने करीनाच्या रात्रीच्या रूटीनबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली. करीना झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तूप लावून मसाज करते. तुपाच्या वासामुळे घरातील वातावरण एखाद्या ढाब्यासारखे वाटते, अशी मिश्किल टिप्पणीही सैफने केली.

पायांच्या तळव्यांना तूप लावण्याचे काय आहेत फायदे?

Loading...

करीनाची न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी पायांच्या तळव्यांना तुपाने मसाज करण्याच्या काही फायद्यांविषयी माहिती दिली आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना थोड्या तुपाने मसाज केल्याने आराम मिळू शकतो. यासाठी बोटांचे टोक थोड्या तुपात बुडवून ते पायांच्या तळव्यांवर लावावे. त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांनी हलक्या हाताने मसाज करावा. हातांना उबदारपणा जाणवेपर्यंत मसाज करता येतो.

चांगली झोप आणि मानसिक शांतता – रात्री झोपण्यापूर्वी पायांना हलक्या हाताने मसाज केल्याने आराम मिळू शकतो आणि शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते. याशिवाय, मसाजमुळे शरीराला आराम मिळू शकतो आणि मानसिक शांतता जाणवू शकते.
पचनक्रिया सुधारण्यास मदत – पोटाशी संबंधित काही समस्यांमध्ये पायांच्या तळव्यांना मसाज केल्याने आराम मिळतो. ॲसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा जुलाबचा त्रास होत असल्यास पायांच्या तळव्यांना मसाज केली पाहिजे.

 

सांधेदुखीपासून आराम – थंडीच्या दिवसांत काही लोकांना गुडघे, कंबर, खांदे आणि शरीरातील इतर सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. पायांच्या तळव्यांना तुपाने मसाज केल्याने आराम मिळतो.

चिडचिडेपणा आणि इरिटेशन होते कमी – ज्या लोकांचा मूड वारंवार खराब होतो, चिडचिड होते किंवा मानसिक शांतता मिळत नाही, त्यांना पायांच्या तळव्यांना मसाज केल्याने आराम मिळू शकतो. हलक्या हाताने मसाज केल्याने शरीराला आराम मिळण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

लेग क्रॅम्पपासून आराम

अनेकांना रात्री झोपताना पायांच्या पोटऱ्यांमध्ये अचानक गोळे येण्याचा त्रास होतो. अशा वेळी पायांच्या तळव्यांना तुपाने मसाज केल्याने आराम मिळू शकतो.

बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका

बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी जर इसबगोलसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर आता पायांना तूपाने मसाज करा. असे केल्याने छातीत गॅस अडकल्यामुळे होणारा त्रास कमी होण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डीची कमतरतेत आराम

ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असते, त्यांनी पायांच्या तळव्यांना तुपाने मसाज करावा. पचनक्रियेत बिघाड झाल्यास शरीरात व्हिटॅमिन बी१२ शोषले जाण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. अशा लोकांनी पायावर तूपाने मसाज करावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us