नव्या ठिकाणी राहायला जाताय? मग LPG गॅस कनेक्शन ट्रांसफर करण्याच्या ‘या’ सोप्या टीप्स

| Updated on: Jan 09, 2021 | 8:35 PM

राहण्याचा पत्ता बदलला की आपलं गॅस कनेक्शन नव्या ठिकाणी ट्रान्सफर करणं तसं डोकेदुखीचं काम मानलं जातं.

नव्या ठिकाणी राहायला जाताय? मग LPG गॅस कनेक्शन ट्रांसफर करण्याच्या या सोप्या टीप्स
how to get lpg subsidy
Follow us on

मुंबई : एक काळ होता जेव्हा घरगुती गॅस कनेक्शन मिळणं म्हणजे एक वेळखाऊ आणि अवघड प्रक्रिया होती. मात्र, आता गॅस कनेक्शन मिळणं अगदीच सोपं झालं आहे. गॅस कनेक्शन मिळालं की ते पुस्तक आपला अॅड्रेस प्रुफ म्हणूनही वापरता येतं. असं असलं तरी राहण्याचा पत्ता बदलला की आपलं गॅस कनेक्शन नव्या ठिकाणी ट्रांसफर करणं तसं डोकेदुखीचं काम मानलं जातं. त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचणही झालेली पाहायला मिळते. मात्र, याचे नियम समजून घेत काही सोप्या टीप्स लक्षात ठेवल्या तर हे काम देखील अगदी सोपं आहे (Changing location know how to transfer LPG gas connection).

एकाच शहरात पत्ता बदलल्यास काय करावे?

जर तुम्ही एकाच शहरातील एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाला असाल आणि नव्या ठिकाणी गॅस कनेक्शन हस्तांतरित करायचं असेल तर ते अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला आधीच्या गॅस डिस्ट्रिब्यूटरकडून ई-कस्टमर ट्रांसफर अॅडव्हायझरी घ्यावी लागेल. याची वैधता 3 महिने असते. यावरुन ग्राहक नव्या गॅस वितरकाच्या यादीत आपलं नाव समाविष्ट करु शकतो. त्यामुळे तेथे ग्राहकाला नवा गॅस सिलिंडर किंवा रेग्युलेटर खरेदी करण्याची गरज नाही.

एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर झाल्यास काय करावं?

जर एका शहरातून थेट दुसऱ्या शहरात जाण्याची वेळ आली तरी काळजी करण्याचं कारण नाही. अशा स्थितीतही काही सोप्या टीप्सचा वापर केल्यास गॅस कनेक्शन सहजपणे हस्तांतरित करता येते. यासाठी आधीच्या गॅस सिलिंडर वितरकाशी संपर्क करा. तो यासाठी ‘टर्मिनेशन व्हाऊचर’ जारी करेल. जर ग्राहकाने आपल्याजवळील आधीचा सिलिंडर जमा केला तर वितरक त्याला सब्सक्रिप्शन वाऊचरवर जितकी रक्कम आहे ती परत करतो. यावेळी ग्राहकाला आपलं गॅस पुस्तक जमा करण्याची गरज नाही. त्याच पुस्तकावर नव्या ठिकाणी तुम्ही गॅस सिलिंडर घेऊ शकता.

नवं कनेक्शन घेण्यासाठी काय करावं?

नव्या गॅस जोडणीसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मार्गांनी अर्ज करता येतो. नव्या गॅस जोडणीत दोन गॅस सिलिंडर आणि एक रेग्युलेटर मिळते. हिंदु्स्तान पेट्रोलियमच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, दोन सिलिंडरची किंमत 2 हजार 900 रुपये आणि रेग्युलेटरची किंमत 150 रुपये आहे. रबरी नळीची किंमत यापेक्षा वेगळी द्यावी लागेल. जर संबंधित गॅस सिलिंडर भरलेला असेल तर त्याचीही किंमत द्यावी लागेल. नव्या जोडणीसाठी अॅड्रेस प्रूफ म्हणून रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, लँडलाईन नंबर बिल, पासपोर्ट, एलआयसी पॉलिसी, वोटर आयडी यापैकी एक कागदपत्र लागते. ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र लागते.

हेही वाचा :

अ‌ॅड्रेस प्रुफ नसला तरी छोटू सिलिंडर मिळणार; ‘या’ कंपनीकडून होम डिलिव्हरीचीसुद्धा सेवा

घरगुती सिलेंडरवर किती लाखांचा विमा मिळतो; कधी मिळते रक्कम?

नवा महिना महागाईचा, इंधनानंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचीही दरवाढ

Changing location know how to transfer LPG gas connection