अ‌ॅड्रेस प्रुफ नसला तरी छोटू सिलिंडर मिळणार; ‘या’ कंपनीकडून होम डिलिव्हरीचीसुद्धा सेवा

बिना एड्रेस प्रूफ खरीद सकते हैं ‘छोटू’ गैस सिलेंडर, होम डिलीवरी की भी मिलेगी सुविधा मुंबई : देशातील सर्वात मोठी ऑइल आणि गॅस पुरवठा कंपनी इंडियन ऑइलने (IOC) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ही कंपनी कोणताही अ‌ॅड्रेस प्रुफ नसताना ग्राहकांना छोटू सिलिंडर (Chhotu FTL cylinder) देणार आहे. कंपनीच्या नव्या योजनेनुसार ग्राहकांनी फक्त ओळपत्र जरी […]

अ‌ॅड्रेस प्रुफ नसला तरी छोटू सिलिंडर मिळणार; 'या' कंपनीकडून होम डिलिव्हरीचीसुद्धा सेवा
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 10:45 AM

बिना एड्रेस प्रूफ खरीद सकते हैं ‘छोटू’ गैस सिलेंडर, होम डिलीवरी की भी मिलेगी सुविधा

मुंबई : देशातील सर्वात मोठी ऑइल आणि गॅस पुरवठा कंपनी इंडियन ऑइलने (IOC) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ही कंपनी कोणताही अ‌ॅड्रेस प्रुफ नसताना ग्राहकांना छोटू सिलिंडर (Chhotu FTL cylinder) देणार आहे. कंपनीच्या नव्या योजनेनुसार ग्राहकांनी फक्त ओळपत्र जरी दाखवले तर 5 किलो वजनाचा छोटू सिलिंडर मिळू शकतो. कंपनीच्या नव्या योजनेनुसार इंडियन ऑइलचे पेट्रोल पंप, इंंडेन एलपीजी वितरक आणि किराना दुकानांवरसुद्धा छोटू सिलिंडर मिळू शकेल. इंडियन आइल कॉर्पोरेशन लिमिटेडने छोटू सिलिंडरची सेवा मागील वर्षात डिसेंबर महिन्यामध्ये सुरु केली होती. (indane chotu cylinder buying method and all information)

आर्थिक दृष्टीकोनातून दुर्बल असेलल्या घटकांसाठी इंडियन ऑइलने ही छोटू सिलिंडरची सुविधा सुरु केली आहे. प्रवासी, मजूर, व्यवसाय,नोकरीनिमित्त एकटे राहणारे तरुण यांना अन्न शिजवण्यासाठी एलपीजी गॅस कमी लगतो. त्यांच्यासाठी सुविधाजनक व्हावं म्हणून कंपीनने छोटू सिलिंडरचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 5 किलो मिनी सिलिंडरची किंमत 257 रुपये आहे.

सिलिंडर बुक करण्याचे वेगवेगळे पर्याय

इंडेन गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. ग्राहकांना घरी बसून गॅस सिलिंडर बुक करता येईल. व्हॉट्सअ‌ॅप, मिस्ड कॉल, एसएमएस, इंडियन ऑइल अ‌ॅप, भारत बील पेमेंट सिस्टम आणि https://cx.indianoil.in/ या पोर्टलवरुन गॅस सिलिंडर बुक करता येऊ शकते.

>> इंडियन ऑइल कंपनीचे गॅस सिलिंडर बुक करायचे असेल तर 8454955555 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमचे सिलिंडर बुक होईल.

>> व्हॉट्सअ‌ॅपद्वारे (WhatsApp) REFILL शब्द टाईप करुन 7588888824 नंबरवर मेसेज केल्यानंतरसुद्धा तुमचा गॅस बुक होऊ शकतो.

>> 7718955555 या मोबाईल नंबरवर एसएमएस किंवा आयव्हीआरएस पाठवून गॅस सिलिंडर बुक करता येते.

छोटू सिलिंडर वजनाने हलका असतो. त्यामुळे तो स्वस्तदेखील असतो. त्याची वहतूक करणे सोपे असल्यामुळे छोटू सिलिंडरला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या :

देशातील 1.7 कोटी दुकानदारांना Paytm चं गिफ्ट, वॉलेटद्वारे केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही

Paytm लघु उद्योजकांना 1000 कोटींचं कर्ज वाटणार, कोणत्याही गॅरंटीची गरज नाही

(indane chotu cylinder buying method and all information)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.