Shopping: कुठे आहे जिन्सचं सर्वात स्वस्त मार्केट? 100 – 200 रुपयांमध्ये मिळतात जिन्स!

Shopping: शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही. पण अनेक जण स्वस्त शॉपिंग कुठे करता येईल याबद्दल कोणाला काही माहिती नसतं. तर आता जाणून घ्या सर्वात स्वस्त जिन्स कुठे मिळतील... या मार्केटमध्ये फक्त 100 - 100 रुपयांपर्यंत जिन्स मिळतील.

Shopping: कुठे आहे जिन्सचं सर्वात स्वस्त मार्केट? 100 - 200 रुपयांमध्ये मिळतात जिन्स!
| Updated on: Sep 28, 2026 | 3:51 PM

Shopping: शॉपिंग करण्यासाठी अनेक मार्केट आहेत. पण कोणता मार्केट कोणत्या वस्तूसाठी प्रसिद्ध आहे. याबद्दल फार कोणाला माहिती नसते. आताच्या ट्रेंडबद्दल बोलायचं झालं तर, मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या जिन्स घालायला आवडतात. पण मॉल किंवा शोरुममध्ये जिन्स घेण्यासाठी गेल्यास 1000 रुपये मोजावे लागतात. पण काही मार्केट असे आहेत, जेथे तुम्हाला अत्यंत स्वस्त दरात जिन्स मिळतील. या मर्केटमध्ये जिन्सचे दर फक्त 100 रुपयांपासून जिन्स मिळतात. तर जाणून घ्या त्या मार्केटबद्दल…

सध्या ज्या मार्केटबद्दल चर्चा रंगली आहे, ते मार्केट मुंबईत नाही तर, दिल्लीत आहेत. मुंबई शॉपिंगसाठी अनेक पर्याय आहेत. पण दिल्ली देखील शॉपिंगसाठी बेस्ट आहे. म्हणून तुम्ही जर कधी दिल्लीत गेलात तर या मार्केटला नक्की भेट द्या आणि कमी दरात जिन्स खरेदी करा…

Loading...

पश्चिम दिल्लीतील रघूबीर नगर येथील ‘घोडे वाला मंदिर मार्केट’ अतिशय कमी किमतीतील कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे बाजार सामान्य बाजारांपेक्षा थोडं वेगळं आहे. रिपोर्टनुसार, येथे जिन्स, शर्ट, साड्या आणि इतर कपडे खूपच कमी दरात विकले जातात. काही व्यापाऱ्यांनी येथे फक्त 100 रुपयांत जीन्स मिळण्याबद्दल देखील सांगितलं आहे.

घोडे वाला मंदिर मार्केटमध्ये सकाळ होण्यापूर्वीच ग्राहकांची वर्दळ सुरू होते. जुन्या रिपोर्टनुसार, येथील बाजारात पहाटे 4 वाजल्यापासूनच कपड्यांची खरेदी-विक्री सुरू होते. रघूबीर नगरच्या पदपथ बाजारात फक्त 100 रुपयांपासून जीन्स मिळते. याच कारणामुळे या मार्केटमध्ये तरुण वर्गाची गर्दी अधिक असते.

दिल्ली येथील दुसऱ्या स्वस्त आणि मस्त मार्केटबद्दल सांगायचं झालं तर, गांधी नगर मार्केट, जे विशेषतः होलसेल कपड्यांसाठी ओळखलं जातं. या मार्केटमध्ये जीन्स, शर्ट, टी-शर्ट आणि इतर तयार कपड्यांची अनेक दुकाने आहेत. गांधीनगरमध्ये जीन्सची किंमत 150 ते 200 रुपयांपासून सुरू होते. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, कमी किमतीची जीन्स खरेदी करण्यासाठी अनेकदा एकाच वेळी अनेक पीस घ्यावे लागतात.

काही रिपोर्टनुसार, येथे जीन्स सेटमध्ये खरेदी करावी लागू शकते आणि 10 -15 पीस घेतल्यास किंमत बऱ्यापैकी कमी कमी होऊ शकतात. बाजारात जीन्सची किंमत डिझाईन आणि गुणवत्तेनुसार वेगवेगळी असते. त्याच प्रमाणे, जर तुम्हाला व्यवसायासाठी 30 ते 40 पीस घ्यायचे असतील, तर हे खूप स्वस्त पडेल. त्यामुळे जर कधी दिल्लीची ट्रिप ठरली, तर या दोन मार्केटमध्ये नक्की जा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us