Beauty Trend : अरे हे काय चाललंय! अंडरआर्म्सचे केस कलर करण्याचा ट्रेंड, नेमकी भानगड तरी काय?

अंडरआर्म्सचे केस शेव्ह करणे ही अनेक महिलांच्या ब्युटी रुटीनचा भाग असताना चीनमध्ये याच्या अगदी उलट ट्रेंड चर्चेत आला आहे. काही तरुणी अंडरआर्म्सचे केस काढण्याऐवजी निळा, गुलाबी आणि जांभळा अशा व्हायब्रंट रंगांमध्ये रंगवून फ्लॉन्ट करत आहेत. Red Note वर या ट्रेंडचे व्हिडीओ आणि ट्युटोरियल्स शेअर होत असून, ब्युटी स्टँडर्ड्सना आव्हान देण्याचा हा एक मार्ग असल्याचेही मानले जात आहे. मात्र, अंडरआर्म्सची संवेदनशील त्वचा लक्षात घेता हेअर कलर वापरण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

Beauty Trend : अरे हे काय चाललंय! अंडरआर्म्सचे केस कलर करण्याचा ट्रेंड, नेमकी भानगड तरी काय?
Beauty Trend
| Updated on: Sep 28, 2026 | 3:10 PM

अंडरआर्म्सचे केस काढणे किंवा शेव्ह करणे हा अनेक महिलांच्या ब्युटी रुटीनचा भाग मानला जातो. विशेषतः स्लीव्हलेस ड्रेस किंवा टॉप घालताना अंडरआर्म्सचे केस काढण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, चीनमध्ये सध्या याच्या अगदी उलट ट्रेंड पाहायला मिळत आहे. चीनमधील काही तरुणी अंडरआर्म्सचे केस काढण्याऐवजी ते वेगवेगळ्या चमकदार रंगांमध्ये रंगवून फ्लॉन्ट करत आहेत.

या ट्रेंडमध्ये अंडरआर्म्सचे केस निळा, गुलाबी, जांभळा अशा व्हायब्रंट रंगांमध्ये रंगवले जात आहेत. केस अधिक उठून दिसावेत आणि त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी खास चमकीले रंग निवडले जात असल्याचे दिसून येत आहे.

Loading...

चीनमधील लोकप्रिय लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म Red Note वर या ट्रेंडशी संबंधित व्हिडीओ आणि ट्युटोरियल्स मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. काही महिलांसाठी हा ट्रेंड केवळ फॅशनपुरता मर्यादित नाहीये, तर पारंपरिक ब्युटी स्टँडर्ड्सना आव्हान देण्याचाही एक मार्ग मानला जात आहे. तर या ट्रेंडला फॉलो करुन महिलांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की ते त्यांना हवं ते मोकळोपणाने आणि बिनधास्तपणे करु शकतात.

मात्र, अंडरआर्म्सच्या केसांना अशा प्रकारे रंग देणे त्वचेसाठी कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. अंडरआर्म्सची त्वचा संवेदनशील असल्याने कोणतेही हेअर कलर किंवा केमिकल प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्यातील घटक आणि संभाव्य त्वचेवरील प्रतिक्रिया यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

अंडरआर्म्सच्या केसांचं नेमकं काम काय?

अंडरआर्म्समध्ये केस असणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. हातांची हालचाल होत असताना त्वचेचा त्वचेशी होणारा घर्षण कमी करण्यासाठी हे केस काही प्रमाणात कुशनिंगचे काम करतात. याशिवाय, शरीराच्या नैसर्गिक वासाशी संबंधित प्रक्रियेतही अंडरआर्म्समधील केसांची भूमिका आहे असे म्हटले जाते.

मात्र, अंडरआर्म्सचे केस ठेवणे किंवा काढणे ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक पसंती आहे. काहींना केस काढणे अधिक सोयीचे वाटते, तर काही जण नैसर्गिक केस ठेवणे पसंत करतात. चीनमध्ये सुरू झालेला हा नवा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us