उन्हाळ्यात 1 वाटी दही खाण्याचे जबरदस्त फायदे…

| Updated on: Mar 24, 2021 | 9:36 AM

दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

उन्हाळ्यात 1 वाटी दही खाण्याचे जबरदस्त फायदे...
दही
Follow us on

मुंबई : दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात एक वाटी दही खाण्याचे कोणते फायदे होतात हे सांगणार आहोत. (Eating Curd in summer is beneficial for health)

-दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात

-उन्हाळ्यात दिवसात बऱ्याचदा पोटाशी संबंधित अनेक समस्या असतात. दही आपल्या पाचन तंत्र (Digestion) मजबूत करण्यास मदत करते. एक चांगला बॅक्टेरिया आहे, जो पाचन तंत्रात अडथळा टाळतो आणि थंडपणा देतो. पोट खराब असल्यास, किंवा लूज मोशन असेल तर दही यावर चांगला उपाय ठरतो.

-दहीमध्ये एक लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. तसेच, उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचेवर परिमाण होत असतो. चेहऱ्यासाठी दही उपयुक्त आहे. दहीमध्ये लिंबाचा रस घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यास उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण होते. त्वचेला आराम मिळतो आणि त्वचा साफ होते. तसेच, केसांमधील डान्ड्रफची समस्या काढून टाकण्यात दही देखील उपयुक्त आहे.

-आजकाल सर्वाना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घालून दही तयार केले जायचे. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून दह्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे मिळतात.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Eating Curd in summer is beneficial for health)