पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

आपण आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब करतो. परंतु, बर्‍याचदा आपण शरीराकडे लक्ष देत असताना आपल्या पायांकडे दुर्लक्ष करतो.

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 5:55 PM

मुंबई : आपले शरीर निरोगी असावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. तसेच आपण आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब करतो. परंतु, बर्‍याचदा आपण केवळ शरीराकडे लक्ष देत असताना आपल्या पायांकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे आपण बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पायांना येणारा दुर्गंध. पायाच्या दुर्गंधीमुळे अनेकदा आपण चपला काढण्यासही कचरतो (Know how can you remove foot smell by easy steps).

तथापि, लोक या समस्येवर मात करण्यासाठी बऱ्याच प्रकारचे डीओ आणि परफ्यूम वापरतात. परंतु, हे प्रभावी उपाय नाहीत. कधीकधी यामुळे दुसऱ्या अनेक समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण बाहेरून येऊन थेट घरात प्रवेश करता आणि आपले मोजे काढता तेव्हा त्याचा वास संपूर्ण घरात पसरतो. यामुळे इतरांनादेखील त्रास होतो. मात्र, ही समस्या टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपायांचा वापर करून या दुर्गंधाला दूर ठेऊ शकता.

रोजच्या रोज मोजे धुवा.

बर्‍याचदा लोक घाईगडबडीमुळे मोजे न धुताच घालण्याची चूक करतात. यामुळे, मोज्यांना वास येतो आणि तो कायमचा टिकतो. याव्यतिरिक्त, त्यात अनेक बॅक्टेरिया देखील वाढतात. म्हणूनच दररोज धुवून मोज्यांचा वापर करणे गरजेचे आहे. वेळ नसल्यास आपण एकाऐवजी तीन-चार जोड मोजे घेऊ शकता, यामुळे ते बदलणे सोपे होईल (Know how can you remove foot smell by easy steps).

मोजे आणि बूटांमध्ये ओलावा टिकू देऊ नका.

बर्‍याच वेळा आपले बूट आणि मोजे ओले होतात किंवा खराब हवामानामुळे त्यांच्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि यामुळे त्यांना दुर्गंधी येते. अशा परिस्थितीत आपले बूट हेयर ड्रायरने वाळवा आणि मगच घाला. जेणेकरून त्यांच्यातील ओलावा निघून जाईल आणि त्यांना वाससुद्धा येणार नाही.

लेव्हेंडर तेल वापरा.

शूजमधून येत असलेल्या दुर्गंधीसाठी आपण लेव्हेंडर तेल देखील वापरू शकता. या तेलाचे काही थेंब शूजमध्ये टाकून ठेवा. यामुळे आपल्या चपलांचा वास निघून जाईल. तसेच, नायलॉन आणि सूती मोजे वापरावे कारण ते घाम शोषतात.

चहाने दुर्गंधी दूर करा.

चहामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे संसर्ग रोखतात. पायांचा दुर्गंध दूर करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका ग्लास पाण्यात दोन-तीन टी बॅग घाला. नंतर हे पाणी काही काळ उकळवा. ते थंड झाल्यावर हे पाणी टबमध्ये घाला आणि त्यामध्ये थोडेसे साधे पाणी घालून, पाय बुडवून ठेवा. यामुळे पायाची दुर्गंधी दूर होईल.

मीठाच्या पाण्यात पाय भिजवा.

एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे मीठ मिसळा. या पाण्यात पाय थोडा वेळ बुडवून ठेवा. यामुळे पायांचे स्नायू मोकळे होतील आणि दुर्गंधीही दूर होतील.

(Know how can you remove foot smell by easy steps)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.