बहुगुणी, आरोग्यवर्धक आवळ्याचे अति सेवन करताय? थांबा, आधी हे दुष्परिणाम वाचा..

| Updated on: Mar 24, 2021 | 10:22 AM

आवळा आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते.

बहुगुणी, आरोग्यवर्धक आवळ्याचे अति सेवन करताय? थांबा, आधी हे दुष्परिणाम वाचा..
आवळा
Follow us on

मुंबई : आवळा आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल. मात्र, आवळ्याचे अति सेवन केले तर आपल्या आरोग्यासाठी ते धोकादायक आहे. (Eating too much amla is dangerous for health)

-आवळ्यामुळे आपल्या शरीरातील फायबरचे प्रमाण नियंत्रित राहते. पण फायबरचं अधिक सेवन केल्यास बद्धकोष्ठताची समस्या आणखीनच वाढू शकते. शिवाय पोटाचे विकार देखील उद्भवू शकतात.

-गरोदरपणात आवळ्याचे सेवन केल्यास अनेक समस्या निर्माण होवू शकतात. गरोदरपणात आवळा खाणं योग्य आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे गरोदर महिलांनी आवळ्य़ाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

-आवळ्यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आवळ्याचे जास्त सेवन केल्यास सीरम ग्लूटामिक पायरुविक ट्रान्समिनेजची मात्रा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पचन क्रिया मंदावते.

-सर्दी-खोकल्यासाठी देखील आवळा फायदेशीर नाही. आवळ्याच्या सेवनामुळे शरीरातील तापमान कमी होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यासाठी आवळा उपयुक्त नाही.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Eating too much amla is dangerous for health)