Fashion Tips : जड कानातल्यांमुळे कान दुखतात, ‘या’ टिप्स फॉलो करा नाही होणार त्रास
Fashion Tips : अनेक महिलांना लांब कानातले घालायला आवडतात पण, जड कानातल्यांमुळे कान दुखतात आणि त्रास होतो. पण काही उपाय केल्याने हा त्रास तुम्हाला होणार नाही... तर जाणून घ्या खास टिप्स

Fashion Tips : आता तर सणांचे दिवस सुरु आहेत, त्यामुळे महिलांनी साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग कानातले लागतात, कानातल्यांमुळे लूक कंप्लिट होतो असं म्हणालयला हरकत नाही. पण जड कानातले घातल्यामुळे कानाला त्रास होतो. लाल झालेले कान, सुजलेले कान अशा वेदना जाणवू लागतात. याच भीतीने अनेक महिला जड कानातले घालत देखील नाहीत… सांगायचं झालं तर, वेदना नकली दागिन्यांमधील धातू आणि कानाची त्वचा यांच्यातील तीव्र संघर्षामुळे होते. जेव्हा घाम स्वस्त तांबे किंवा निकेलमध्ये मिसळतो, तेव्हा ॲलर्जी सुरू होते. त्याशिवाय, जड पेंडंटच्या वजनामुळे कानाच्या छिद्रावर दाब येतो. जर हे दीर्घकाळ चालू राहिलं, तर कानाचे छिद्र मोठं होण्याची आणि फाटण्याचीही भीती असते.
अशा वेळेस काय केलं पाहिजे?
कानातले घालण्यापूर्वी कानाचे छिद्रे असतील तेखे थोडे खोबरेल तेल किंवा अँटीसेप्टिक क्रीम लावणे ही एक चांगली कल्पना आहे. यामुळे त्वचा मऊ राहील आणि कानातल्यांच्या घर्षणाने होणारी जळजळ टाळता येईल.
कानाच्या छिद्रच्या मागे एक छोटा ‘इअर पॅच’ किंवा सर्जिकल टेप लावल्याने चांगला परिणाम होतो. त्यामुळे कानाची पाळी मजबूत राहते आणि जड कानातल्यांचे पूर्ण वजन थेट कानाच्या पाळीवर पडत नाही.
झुमक्यासोबत सुंदर चेन किंवा पेंडेंट घातल्याने केवळ राजेशाही लुकच मिळत नाही, तर कानांवरील दाबही कमी होतो, कारण त्यामुळे पेंडेंटचे वजन कानांऐवजी केसांवर समान रीतीने विभागले जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नकली कानातले घालण्यापूर्वी ते पुसून घेणं महत्त्वाचे आहे. यामुळे कानाच्या आत धूळ किंवा जंतू साचून संसर्ग होण्यास प्रतिबंध होतो.
व्हिडिओ किंवा रीलचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर, तुमच्या कानांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळावी म्हणून किमान एका क्षणासाठी तुमचे दागिने काढून टाकावेत., आतापासून जड दागिने घालण्यापूर्वी या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास, ते अवघड जाणार नाही. तुमचा पोशाख कोणत्याही त्रासाशिवाय परिपूर्ण दिसेल…