नवरात्रीत रोज साबुदाणा खाताय? शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम, जाणून घ्या

Navratri Fasting Tips: नवरात्रीच्या उपवासात बहुतांश लोक साबुदाणा खातात. पण रोज साबुदाणा खाल्ल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? याबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

नवरात्रीत रोज साबुदाणा खाताय? शरीरावर होऊ शकतात हे परिणाम, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Oct 14, 2026 | 2:15 PM

शारदीय नवरात्री सुरू झाली असून, ९ दिवसांच्या उपवासाच्या काळात बहुतांश लोकांचा साबुदाणा खाण्याकडे कल असतो. केवळ साबुदाण्याची खिचडी, खीर नाही तर साबुदाण्यापासून बनवलेल्या अनेक पदार्थांच्या रेसिपी सोशल मीडियावर उपलब्ध असतात. बरीच लोकं दररोज संध्याकाळच्या फराळासाठी साबुदाणा खातात. तुम्हाला माहित आहे का साबुदाणा म्हणजे काय? तो कसा बनवला जातो, त्यात पोषक तत्वे असतात की नाही आणि दररोज त्याचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

साबुदाणा म्हणजे फक्त स्टार्च, बाकी काही नाही

Loading...

रायपूरमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जयेश शर्मा यांनी सोशल मिडीयावर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितले की, साबुदाणा हे नवरात्रीत खाल्ले जाणारे एक मुख्य अन्न आहे. तो चवीला स्वादिष्ट असला तरी, त्यावर खूप प्रक्रिया केलेली असते आणि तो शुद्ध स्टार्च असतो, जो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. तसेच, तो स्थानिक नाही. कारण ज्या मुळापासून तो बनवला जातो, ती टॅपिओका वनस्पती प्रामुख्याने ब्राझीलमध्ये उगवते.

साबुदाण्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते

कृष अशोक हे अन्नाबद्दलची वैज्ञानिक तथ्ये सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी एका व्हिडिओत सांगितले की, साबुदाणा चविष्ट असल्यामुळे त्यांनाही आवडतो, पण तो एक अति-प्रक्रिया केलेला पदार्थ आहे आणि त्यात स्टार्च शिवाय दुसरे काहीही नाही. जर तुम्ही उपवासात तो खात असाल, तर तुम्ही अशा कर्बोदकांचे सेवन करत आहात ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. बोबा आणि बलल टीमध्ये देखील सेम स्टार्च वापरले जाते.

उपवास दरम्यान काय खावे?
डॉ. जयेश शर्मा म्हणतात की, साबुदाणा व्यतिरिक्त, आपण करत असलेली दुसरी सामान्य चूक म्हणजे अति खाणे. उपवासाला ‘फलाहार’ म्हणतात, ज्यामध्ये फक्त फळे खाणे अपेक्षित असते. पण आपण सोपे मार्ग शोधले आहेत. उपवासाच्या काळात राजगिरा किंवा कुट्टू खावे. त्यामध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने ते धान्यांपेक्षा एक चांगला पर्याय ठरतात. याव्यतिरिक्त, सुकामेवा (बदाम, अक्रोड, काजू इत्यादी) आणि बियांचे सेवन करावे. थोडे दही किंवा ताक प्यावे.

 

कसा बनवला जातो साबुदाणा?

साबुदाणा प्रामुख्याने टॅपिओका मुळापासून बनवला जातो, ज्याला कसावा असेही म्हणतात. ही मुळे मोठ्या रताळ्यासारखी दिसतात. कारखान्यांमध्ये ती धुतल्यानंतर, त्यांची बाहेरील तपकिरी साल काढली जाते, ज्यामुळे आतून ती पूर्णपणे पांढरी राहतात. त्यांची पेस्ट बनवल्यानंतर, ती पाण्यात विरघळवून तंतू वेगळे करण्यासाठी गाळली जाते, ज्यामुळे फक्त पांढरा स्टार्च शिल्लक राहतो. नंतर तो वाळवून त्याचे दाणे बनवले जातात. त्यानंतर त्यांना पॉलिश करून पॅक केले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us