भिजवलेले आणि सोललेले बदाम आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याची 4 कारणे!

| Updated on: Oct 18, 2021 | 8:33 AM

आपण बऱ्याच लोकांकडून ऐकले असेल की, भिजवलेली बदाम सोलून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण भिजवलेले बदाम खरोखर चांगले आहेत का? ते कोणते अतिरिक्त आरोग्य फायदे देतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर भिजवलेली बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे. भिजवलेले बदाम कच्च्या बदामांपेक्षा चांगले असतात.

भिजवलेले आणि सोललेले बदाम आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याची 4 कारणे!
बदाम
Follow us on

मुंबई : आपण बऱ्याच लोकांकडून ऐकले असेल की, भिजवलेली बदाम सोलून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण भिजवलेले बदाम खरोखर चांगले आहेत का? ते कोणते अतिरिक्त आरोग्य फायदे देतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर भिजवलेली बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे. भिजवलेले बदाम कच्च्या बदामांपेक्षा चांगले असतात.

बदामाचे फायदे

बदाम पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. त्यामध्ये फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे, फॉस्फरस असतात. हे सर्व पोषक घटक वजन कमी करण्यास, हाडांचे आरोग्य, मूड सुधारण्यास, हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

अभ्यासानुसार लोक शेंगदाणे, अक्रोड आणि बदामांचे जास्त प्रमाणात सेवन करून स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करू शकतात. बदाम शरीरातील अँटीऑक्सिडंट्सची पातळी वाढवतात. रक्तदाब कमी करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात. म्हणून, जर तुम्ही काही बदाम खात असाल तर ते बदाम तुम्ही रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी सोलून खा.

1. पचन सुधारते

भिजवलेले बदाम पचायला सोपे आणि कच्च्या किंवा भाजलेल्या बदामांपेक्षा चांगले असतात. भिजलेली कोणतीही गोष्ट चघळणे सोपे असते आणि पचनसंस्था बिघडण्याची शक्यता यामुळे कमी होते. भिजवल्यावर बदामाचे फायदे अनेक पटीने वाढतात.

2. अतिरिक्त पोषण

बदाम भिजवल्याने पोषक उपलब्धता सुधारते आणि अँटिऑक्सिडंट आणि फायबरचे फायदे वाढतात. बदाम भिजवल्याने देखील अशुद्धी काढून टाकते जे काही पोषक घटकांचे शोषण रोखू शकते.

3. वजन कमी करते

भिजवलेले बदाम लिपेज सारखे एन्झाइम सोडतात. जे चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल, तर तुम्ही तुमच्या जेवण, नाश्ता किंवा स्नॅक्समध्ये भिजवलेले बदाम खाऊ शकतात.

4. फायटिक अॅसिड काढून टाकते

जेव्हा आपण बदाम भिजवत नाही, तेव्हा त्यामध्ये असलेले फाइटिक अॅसिड बाहेर पडते, जे शेवटी पोषक घटकांचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्यामुळे कच्चे बदाम खाल्ल्याने त्यात असलेले झिंक आणि लोह व्यवस्थित भिजत नाही.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Soaked almonds are extremely beneficial for health)