Mumbai Cheapest Shopping Market : कपड्यांपासून चपलांपर्यंत, व्हरायटीच व्हरायटी.. स्वस्त शॉपिंगसाठी मुंबईतील बेस्ट मार्केट; टायमिंग-लोकेशन पहा..

Mumbai Cheapest Shopping Market : आजच्या महागाईच्या काळात मुंबईकर एकाच गोष्टीच्या शोधात असतो आणि ती गोष्ट म्हणजे स्वस्त वस्तू कुठे मिळतील. मुंबईत एक असं स्वस्त मार्केट आहे, जिथे स्वस्त आणि मस्त वस्तू मिळतील. तर जाणून घ्या मार्केटचं टायमिंग आणि लोकेशन

Mumbai Cheapest Shopping Market : कपड्यांपासून चपलांपर्यंत, व्हरायटीच व्हरायटी.. स्वस्त शॉपिंगसाठी मुंबईतील बेस्ट मार्केट; टायमिंग-लोकेशन पहा..
Crawford Market
| Updated on: Jul 16, 2026 | 3:48 PM

Mumbai Cheapest Shopping Market : आजच्या काळात शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही. पण मॉल आणि महागड्या दुकांमधून वस्तू घेणं कोणाला परवडत नाही. पण मुंबईत अनेक असे मार्केट आहेत. जिथे स्वतः आणि मस्त वस्तू मिळतील. पण एक मार्केट तर असं आहे, जेथे अनेक वस्तू फार कमी दरात म्हणजे होलसेलच्या दरात मिळतात. मुंबईतील या मार्केटचं नाव आहे, क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market). गेल्या अनेक वर्षांपासून हे मार्केट ग्राहकांना कमी दरात वस्तू देण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईतील हे मार्केट कमी दरांच्या वस्तूंसाठी ओळखलं जात आहे… मुंबईतील हा मार्केट परवडणाऱ्या दरातील वस्तूंसाठी ओळखला जातो. येथे कपड्यांपासून ते चपलांपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू घाऊक दरात मिळू शकतात. तसेच, साड्यांसाठीही हे एक उत्तम ठिकाण आहे.

स्वस्त वस्तूंसाठी आहे या मार्केटची ओळख…

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे स्वस्त दरातील वस्तूंसाठी ओळखलं जातं. येथे कपड्यांपासून ते चपलांपर्यंत अनेक प्रकारच्या वस्तू घाऊक दरात उपलब्ध आहेत. साड्यांसाठीही हे एक उत्तम ठिकाण असून, येथे कमी किमतीत विविध प्रकारच्या आणि शैलींच्या साड्या मिळतात. याव्यतिरिक्त, दैनंदिन वापरासाठीच्या कपड्यांचेही अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत.

येथे काय काय मिळतं ते जाणून घ्या:

‘हर जिंदगी’ (Her Zindagi) या वेबसाइटनुसार, हे मार्केट एका अशा इमारतीत वसलेले आहे जी अनेक पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं. ही इमारत साधारणपणे 1869 सालातील आहे. या मार्केटमध्ये फक्त कपडे आणि शोच्या वस्तू नाही तर, ड्राय फ्रूट ग्रोसरी आणि घरासाठी अनेक वस्तू देखील मिळतात.

कुठे आहे हे मार्केट?

क्रॉफर्ड मार्केट मुंबईच्या दक्षिण विभागात स्थित आहे. तुम्ही येथे स्थानिक बस किंवा ट्रेनने पोहोचू शकता. सर्वात जवळचा स्थानिक बस थांबा ‘मंगलदास मार्केट’ आहे आणि सर्वात जवळचे लोकल ट्रेनचे स्थानक ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ आहे. हे मार्केट रोज सकाळी 11 वाजता सुरु होतं आणि रात्री 8 किंवा 9 वाजेपर्यंत सुरु असतं. लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट म्हणजे, हे मार्केट रविवारी बंद असतं. त्यामुळे तुम्ही सोमवार ते शनिवार या मार्केटमध्ये शॉपिंगचा आनंद घेऊ शकता.

Follow Us