कोरियन लोकांसारखी त्वचा मिळवायची असेल तर घरीच बनवा ‘हा’ फेसपॅक!

तुम्हाला कोरियन ग्लास स्किन हवी असेल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी बेस्ट ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग दूर होण्यास मदत होते. इतकंच नाही तर ऑरेंज फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतो, तर चला जाणून घेऊया फेसपॅक कसा बनवावा.

कोरियन लोकांसारखी त्वचा मिळवायची असेल तर घरीच बनवा हा फेसपॅक!
skin care
| Updated on: Jun 05, 2023 | 5:29 PM

मुंबई: संत्रा मध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी, कोलीन, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारख्या गुणधर्मांनी समृद्ध रस असतो. त्यामुळे संत्रा आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेलाही पोषण प्रदान करतो. तर आज आम्ही तुमच्यासाठी ऑरेंज फेसपॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला कोरियन ग्लास स्किन हवी असेल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी बेस्ट ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग दूर होण्यास मदत होते. इतकंच नाही तर ऑरेंज फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतो, तर चला जाणून घेऊया ऑरेंज फेसपॅक कसा बनवावा.

ऑरेंज फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • 1 संत्र्याची साल
  • ताजी कोरफड जेल
  • अर्धा चमचा ग्लिसरीन

ऑरेंज फेसपॅक कसा बनवावा?

  • ऑरेंज फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक पॅन घ्या.
  • मग त्यात साधारण १ संत्र्याची साल घाला.
  • त्यानंतर साधारण ५ मिनिटे उकळून थंड करावे.
  • मग त्यात ताजी कोरफड जेल घाला.
  • यानंतर त्यात अर्धा चमचा ग्लिसरीन घाला.
  • मग तुम्ही या तीन गोष्टी नीट मिक्स करा.
  • आता तुमचा ऑरेंज फेसपॅक तयार आहे.

ऑरेंज फेस पॅक कसा लावावा?

  • ऑरेंज फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्यावा.
  • त्यानंतर तयार केलेला पॅक ब्रशच्या साहाय्याने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा.
  • यानंतर साधारण १५ ते २० मिनिटे वाळवून घ्या.
  • त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून कमीत कमी 15 वेळा हा पॅक लावा.
  • याचा सतत वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)