AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Local Elections:   ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर, ठाकरेंच्या सेनेत तिकीट वाटपावरून नाराजी

Maharashtra Local Elections: ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट ‘मातोश्री’वर, ठाकरेंच्या सेनेत तिकीट वाटपावरून नाराजी

| Updated on: Dec 31, 2025 | 11:33 AM
Share

मुंबईतील आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेत तिकीट वाटपावरून तीव्र नाराजी पसरली आहे. फायर आजी यांनी थेट मातोश्री गाठून सातव्यांदा श्रद्धा जाधवांना तिकीट दिल्यावर प्रश्न उपस्थित केला. अनेक निष्ठावान शिवसैनिकांना डावलल्याचा आरोप करत मुंबई आणि पुण्यासह विविध ठिकाणी बंडखोरीचा सूर उमटत आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निष्ठावान शिवसैनिकांना डावलल्याने त्यांची नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. फायर आजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ज्येष्ठ शिवसैनिकेने तर थेट मातोश्रीवर धडक दिली. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या श्रद्धा जाधवांना सातव्यांदा उमेदवारी का देण्यात आली, असा सवाल विचारला. एका शाखाप्रमुखाला संधी का नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.

वॉर्ड क्रमांक २०२ मधील शाखाप्रमुख विजय इंदुरकर हे ३६ वर्षांपासून शिवसेनेत काम करत असून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. उद्धव ठाकरे यांनी मुलाखती घेऊनही शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट नाकारण्यात आले, असे इंदुरकर यांनी सांगितले. श्रद्धा जाधवांना २०१४ मध्ये भाजपने एबी फॉर्म दिला होता, असेही ते म्हणाले. त्यांच्या उमेदवारीवर अनेक महिला शिवसैनिकांनीही आक्षेप घेतला आहे. मातोश्री परिसरातील वॉर्ड क्रमांक ९५ मध्येही बंडखोरी झाली आहे. ठाकरे गटाने हरीश शास्त्री यांना उमेदवारी दिल्याने माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि नाराजी उघड झाली आहे

Published on: Dec 31, 2025 11:33 AM