Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांचा मोठा निर्णय; आता कायमचीच…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वयाच्या 53 व्या वर्षीही अत्यंत फिट आहेत. त्यांचा फिटनेस मंत्र साधा आहे: रोज 30 मिनिटे व्यायाम, एक तास खेळ आणि संतुलित आहार. निरोगी राहण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी साखर सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जंक फूड टाळणे आणि योग्य जीवनशैली यामुळेच सचिन तेंडुलकर आजही उत्साही आणि तंदुरुस्त आहेत.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांचा मोठा निर्णय; आता कायमचीच...
sachin tendulkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 3:49 PM

वयाच्या 53 व्या वर्षीही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फिट आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बहुतेक खेळाडू आपल्या फिटनेसकडे लक्ष देत नाहीत. पण सचिन तेंडुलकर यांनी फिटनेसकडे नेहमी गंभीरपणे पाहिले आहे. त्यामुळेच फिट राहण्यासाठी सचिन नवनव्या गोष्टी करत असतात. चुकीच्या सवयींपासून दूर राहतात. तुम्ही फिट राहिला नाही तर नेहमी आजारी असल्यासारखं तुम्हाला वाटेल. त्यामुळे शरीर काम करणं बंद करेल, असं सचिन यांचं मत आहे. विशेष म्हणजे, सचिन फिटनेससाठी अधिक मेहनत करत नाहीत. त्यांचा मंत्र अत्यंत साधा आणि सरळ आहे. सचिन यांचा हाच फिटनेस मंत्र जाणून घेऊया.

सचिन तेंडुलकर यांच्या मते, प्रत्येकाने फक्त अर्धा तास जीममध्ये जाऊन वर्कआऊट केलं पाहिजे. मन लावून वर्कआऊट केलं पाहिजे. फिट राहण्यासाठी ते स्वत: स्ट्रेचिंग, योग आणि वेट ट्रेनिंग करतात. त्यांच्या रुटीनमध्ये डम्बल स्क्वाइट्स, लेग प्रेस, केबल रोप पुलओव्हर आणि कोबरा पोज आदी गोष्टी असतात. त्यांच्या मते, जर तुम्ही वर्कआऊट करत नसाल तर रोज अर्धा तास फिरा आणि धावा. असं केल्याने शरीर फिट आणि अॅक्टिव्ह राहील.

Loading...

रोज खेळा

सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतरही क्रिकेट खेळतात. त्यासाठी रोज आधी वॉर्म अप करतात. ते रोज सुमारे तासभर क्रिकेट खेळतात. त्यामुळे मन शांत राहतं. शरीर अॅक्टिव्ह राहतं. प्रत्येकाने एक खेळ निवडला पाहिजे. तो रोज खेळला पाहिजे. त्यामुळे शरीर निरोगी आणि मन आनंदी राहतं, असं ते म्हणतात. एकदा ते म्हणाले होते की, स्पोर्ट्समन असल्यामुळे मी नैसर्गिकरित्या स्वत:ला हार्ड ट्रेन करत होतो. ते माझ्या रुटीनमध्ये आलं. पण बहुतेक लोक सोपी जीवनशैली निवडतात. डायबेटीजपासून दूर राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सकाळी जीमला जायचं आणि वर्कआऊट करायचं. यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही, असंही ते म्हणाले.

खाण्यापिण्यावर कंट्रोल

सचिन यांनी त्यांच्या डाएटमध्ये अनेक पोर्शन डिव्हाइड केले आहेत. त्यांनी डाएटमध्ये 40% कार्बोहायड्रेट, 30% हेल्दी फॅट आणि 30% प्रोटीन सामील केलं आहेत. ते नाश्त्यात मणुक्यासहीत धान्याची भरड घेतात. सोबत चहा वा ताज्या फळांचा रस घेतात. लंचमध्ये ग्रिल्ड सँडविच आणि नरम पनीरसोबत ताजे फळ आणि सॅलड घेतात. त्यानंतर ते प्रोटीन शेक घेतात.

ही सवय सोडली

सचिन यांच्या मते, डायबिटीज ज्या वेगाने पसरत आहे, त्यामुळे आपण फिट राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे त्यांनी साखर खाणं कायमचं बंद केलं आहे. साखर खाणं सर्वात वाईट असल्याचं ते मानतात. साखर आणि जंकफूडपासून ते दूर राहतात. त्यांचा एक साधासोपा नियम आहे. खाण्याच्या टेबलावर 5 मिनिटं कमी बसा, पण 5 मिनिटं एक्सरसाईज अधिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us