साबण कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी एक वरदान हा घरगुती साबण, पण कसा बनवाल

बाजारात मिळणाऱ्या बहुतेक सौंदर्य प्रसाधने त्वचा कोरडी करू शकतात. कारण त्यामध्ये रंग, सुगंध यांसारखी विविध रसायने वापरली जातात. पण साबण कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी घरगुती साबण एक वरदान ठरेल.

साबण कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी एक वरदान हा घरगुती साबण, पण कसा बनवाल
| Updated on: Sep 13, 2026 | 3:24 PM

आज पाहायला गेलं तर, हवेत  प्रदूषणाचं प्रमाण अधिक आहे. ज्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसून येतात. अशात चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेक महागड्या प्रसाधनांचा वापर करतात. पण ते चेहऱ्यासाठी वाईट  ठरु शकतात. पण एक घरगुती उपाय आहे. जेथे तुम्ही घरातच तयार केलेला साबण वापरु शकता. सांगायचं झालं तर, त्वचेच्या काळजीमध्ये स्वच्छता ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. पण, त्वचेसाठी नेहमी सौम्य आणि हलका साबण किंवा बॉडी वॉश वापरावा.

काही लोकांची त्वचा खूप संवेदनशील असते आणि ती लवकर कोरडी होऊ शकते. अशा परिस्थितीत, मॉइश्चरायझिंग गुणधर्म असलेला साबण वापरणं चांगलं मानलं जातं. तुम्ही घरी साबण बनवू शकता, जो तुमची त्वचा कोमल ठेवण्यास मदत करेल. यापैकी बहुतेक साबणांमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. पण, कोणतंही घरगुती त्वचेची काळजी घेणारं उत्पादन वापरण्यापूर्वी, ते तुमच्या त्वचेला अनुकूल आहे की नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे.

रसायनयुक्त सौंदर्य प्रसाधने, विशेषतः संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे जाणून घ्या, घरीच कोरफडीचा साबण कसा बनवायचा ते जाणून घ्या. साबण बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या. 250 ग्रॅम सोप बेस, 2 चमचे ग्लिसरीन, 3 ते 4 व्हिटॅमिन ई कॅप्सूल, 1 चमचा बदामाचं किंवा ऑलिव्हचं तेल किंवा नारळाचं तेल, सिलिकॉन सोप मोल्ड किंवा कोणतेही योग्य भांडे, अर्धा कप ताजा कोरफडीचा गर, मूठभर कडुलिंबाची पाने, टी ट्री इसेन्शियल ऑइलचे 4-5 थेंब.

सर्वप्रथम, कोरफडीच्या पानांमधून गर काढून घ्या आणि तो मिक्सरमध्ये चांगला वाटून घ्या व नंतर गाळून घ्या. कडुलिंबाची पाने धुवून घ्या आणि मिक्सरमध्ये चांगली वाटून त्याची पेस्ट बनवा. आता चाकूच्या साहाय्याने सोप बेसचे लहान चौकोनी तुकडे करा आणि ते एका भांड्यात घेऊन डबल बॉयलरच्या साहाय्याने वितळवा.

जेव्हा सोप बेस पूर्णपणे द्रव होईल, तेव्हा गॅस बंद करा आणि त्यात कोरफडीचा गर घालून चमच्याच्या साहाय्याने चांगले मिसळा. त्यानंतर, तुम्ही त्यात बदामाचे, ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल, ग्लिसरीन, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कडुलिंबाची पेस्ट घालू शकता.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us