मुंबईपासून जवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, विदेशातील लोकांची असते प्रचंड गर्दी

महाराष्ट्रातील या हिल स्टेशन पुढे स्वर्ग देखील आहे फेल, पाहण्यासाठी भारतासह विदेशातून पर्यटक येतात. पावसाळ्यात असते मोठी गर्दी.

| Updated on: Apr 05, 2026 | 1:39 PM
1 / 5
सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेकजण फिरण्यासाठी घराबाहेर जाण्यास नकार देत आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात सर्वात सुंदर हिल स्टेशनबद्दल सांगणार आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेकजण फिरण्यासाठी घराबाहेर जाण्यास नकार देत आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात सर्वात सुंदर हिल स्टेशनबद्दल सांगणार आहेत.

2 / 5

जिथे भारतासह विदेशातील लोक देखील खास भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. आम्ही ज्या हिल स्टेशनबद्दल बोलत आहोत ते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ज्याचे नाव अंबोली हिल स्टेशन आहे. हे निसर्गरम्य ठिकाण सध्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.

3 / 5

अप्रतिम सौंदर्यामुळे या हिल स्टेशनचे स्वर्गाहून सुंदर असे वर्णन केले जाते. मडगावपासून सुमारे 109 किलोमीटर अंतरावर असलेले अंबोली हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. येथे दाट जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि मनमोहक धबधबे यामुळे संपूर्ण परिसर अतिशय मोहक भासतो.

4 / 5

अंबोली हिल स्टेशन हे केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करत आहे. शांतता, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे विदेशी पर्यटकही या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात पसंती देतात.

5 / 5

पर्यटकांसाठी येथे विविध साहसी उपक्रमांचीही सोय आहे. ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, सायकलिंग यांसारख्या अॅक्टिव्हिटीजचा आनंद येथे घेता येतो. याशिवाय, येथील प्रसिद्ध धबधबे आणि व्ह्यू पॉइंट्स पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us