Healthcare Tips : डाळिंब फक्त कोमट पाण्यात भिजवा, शरीराला मिळतील अनेक फायदे, ही ट्रिक माहिती आहे का?

डाळिंबामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक असतात. मात्र कोमट पाण्यात भिजवल्यामुळे त्याचे फायदे आणखी वाढतात. . ही पद्धत नेमकी कशी करायची आणि त्याबाबत काय काळजी घ्यायची, जाणून घ्या.

Healthcare Tips :  डाळिंब फक्त कोमट पाण्यात भिजवा, शरीराला मिळतील अनेक फायदे, ही ट्रिक माहिती आहे का?
pomogranate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 6:45 PM

डाळिंब खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पोषक घटक मिळतात हे तर तुम्हाला माहितचं असेल.पण डाळिंबाचे दाण थेट खाण्याऐवजी आधी काही वेळ कोमट पाण्यात भिजवून खाल्ले तर ? या छोट्याश्या बदलामुळे पचनापासून ते रक्त वाढण्यापर्यंत शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. नेमकी काय पद्धत आहे. खाल्ल्याने काय परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या

डाळिंब कोमट पाण्यात भिजवा

संपूर्ण डाळिंब न सोलता कोमट पाण्यात साधारण 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर डाळिंब सोलून त्या दाणे खावे. आठवड्यातून दोन- तीन वेळा असे डाळिंब खाल्ल्याने शरीराला याचे भरपूर फायदे होतात.

पचनशक्ती सुधारते

डाळिंब कोमट पाण्यात भिजवून खाल्ल्याने पचनक्रिया संतुलित राहते. यामुळे अपचन, गॅस, आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळतो.

कफ आणि सर्दीचा त्रास टळतो

डाळिंब हे प्रकृतीने थंड असते. थेट फ्रिजमधील किंवा थंड डाळिंब खाल्ल्याने काहींना खोकला किंवा कफ होतो. कोमट पाण्याचा वापर केल्याने फळाचा गारवा कमी होतो आणि कफचा त्रास होत नाही.

अँटिऑक्सिडंटचा त्रास वाढतो

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिंडट्स आणि व्हिटॅमिन सी असते. कोमट पाण्यात भिजवल्यामुळे या पोषक तत्वांचे शरीरात सहज शोषम होते.

ताण कमी होण्यास मदत होते

रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी कोमट पाण्यात भिजवलेले डाळिंब खाल्ल्यास शरीराचा ताण कमी होतो. त्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते.

रक्ताची कमतरता दूर होते

डाळिंबात लोहाचे प्रमाण जास्त असते. नियमित या पद्धतीने सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य सुधारते

हे मिश्रण शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रोगप्रतिकारकशक्ती शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

डाळिंब या लोकांसाठी आहे धोकादायक :

लो बिपी

लो बिपी असणाऱ्या लोकांनी डाळिंबाचे सेवन केल्याने आणखी कमी होऊ शकतो. त्यामुळे लो बीपीच्या रूग्णांना चक्कर येऊ शकते.

पचनाच्या समस्या

गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता आणि गॅसचा तीव्र त्रास असल्यास डाळिंबाचे सेवन टाळावे, कारण यातील घटकांमुळे त्रास वाढू शकतो.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us