10 बिअर, 45 झोपेच्या गोळ्या! नर्सच्या त्या मागणीमुळे डॉक्टरने घेतला चुकीचा निर्णय, डोंबिवली हादरली!

डोंबिवलीमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात नामांकीत डॉक्टरने नर्समुळे मोठे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या...

10 बिअर, 45 झोपेच्या गोळ्या! नर्सच्या त्या मागणीमुळे डॉक्टरने घेतला चुकीचा निर्णय, डोंबिवली हादरली!
सांकेतिक फोटो
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 24, 2026 | 3:38 PM

आपण डॉक्टरांना मानवातील देव मानतो. कोणत्याही रुग्णाला योग्य ते उपचार देऊन बरे करण्याची ताकद डॉक्टरांकडे असते. पण कधीकधी डॉक्टरांना देखील कठीण काळाला समोरे जावे लागते. अशाच एक नामांकीत डॉक्टरचे प्रकरण समोर आले आहे. या डॉक्टरकडे नर्सने काही अशा काही मागण्या केल्या होत्या की त्या डॉक्टरने थेट 10 बिअर घेतल्या. त्या प्यायल्यानंतर 45 झोपेच्या गोळ्या घेतल्या. आता नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या प्रकरण…

नेमकं काय घडलं?

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमधील एका नामांकित रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. दहा बिअर पिऊन आणि तब्बल 45 झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे. या डॉक्टरने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत देखील माहिती समोर आली आहे.

का उचलले टोकाचे पाऊल?

संबंधित डॉक्टर विवाहित असून त्यांची पत्नी देखील वैद्यकीय क्षेत्रातील मोठी डॉक्टर असल्याचे समजते. मात्र, संबंधित डॉक्टरचे एका नर्ससोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. या नात्यातून वारंवार लग्नासाठी तगादा लावला जात असल्याने ते मानसिक तणावाखाली होते, अशी प्राथमिक माहिती आहे. याच नैराश्यातून संबंधित डॉक्टरने दहा बिअर प्राशन करून तब्बल 45 झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसात तक्रार दाखल

घटना उघडकीस येताच त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून या प्रकरणी विष्णू नगर पोलिस ठाणे येथे आत्महत्येच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि डोंबिवली परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.