विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल एका क्लिकवर, भाजपाला सर्वात मोठा धक्का..
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर; 3-2 करत निवडणुकीत मविआचे पुढचे पाऊल.बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीचा निकाल आज मध्यरात्री अखेर जाहीर झाला.

पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, मराठवाडा पदवीधर, अमरावती शिक्षक आणि नागपूर पदवीधर या पाच जागांसाठी निवडणूक लढवल्या गेल्या. विधान परिषदेची ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर अत्यंत चुरशीची बनली होती. पहाटेपर्यंत चाललेल्या मतमोजणीचा सकाळी सहा वाजता निकाल जाहीर झाला. भाजपचे सुधाकर कोहळे विरुध्द काँग्रेसचे अभिजित वंजारी अशी मुख्य लढत झालेल्या या जागेवर काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी बाजी मारली.
नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. वंजारींना पहिल्या व दुसऱ्या पसंतीक्रमाची मिळूण एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात 27 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली होती.आज सकाळी 6 वाजता निकाल जाहीर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजित वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले.
विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे 18 हजार 124 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 85 हजार 876 मते मिळाली,तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना 67 हजार 752 मते मिळाली. पसंतीक्रमानुसार डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवली.
पुणे शिक्षक मतदार संघामधून भाजपचे कौस्तुभ गावडेंचा विजय- (Pune Teachers Constituency Result 2026)
पुणे शिक्षक मतदार संघामधून भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या सचिन सानपांचा कौस्तुभ गावडेंनी पराभव केला. तसेच विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.
पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख जाधव यांचा विजय- (Pune Graduates Constituency Result 2026)
पुणे पदवीधर मतदाररसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला. भाजपाच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा धक्कादायक पराभव झाला. तर या जागेवर हर्षदा जाधव देशमुख यांचा तब्बल 9 हजार 700 मतांनी विजय झालाय.पहिल्या फेर सुरुवात झाल्यापासनूच स्मिता जाधव आणि हर्षदा जाधव यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. परंतु नंतरच्या टप्प्यात हर्षदा जाधव यांनी आघाडी घेत विजयाला गवसणी घातली.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या किरण सरनाईकांचा विजय झाला आहे. महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईकांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा त्यांनी पराभव केला. पसंती क्रमांक दोनच्या मतमोजणीमध्ये किरण सरनाईक यांचा विजय झाला. मागील 2020 च्या निवडणुकीमध्ये किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता..
या पाचही जागांवरील विजयी उमेदवार-
पुणे पदवीधर मतदारसंघ- हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार)
पुणे शिक्षक मतदारसंघ- कौस्तुभ गावडे (भाजप)
नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजित वंजारी (काँग्रेस)
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ – डॉ. प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार)
अमरावती शिक्षक मतदारसंघ – किरण सरनाईक (शिवसेना शिंदे)