सप्तश्रृंगी गडावर 500 वर्षांची परंपरा; 4600 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री लावला कीर्तीध्वज, जाणून घ्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा!

| Updated on: Oct 15, 2021 | 5:35 PM

नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर मानाचा ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. मध्यरात्री 4 हजार 600 फूट उंचीवरच्या सुळक्यावर दरेगावच्या पाटील यांनी कीर्तीध्वज लावला आणि भक्तांची पावले घराकडे वळली.

सप्तश्रृंगी गडावर 500 वर्षांची परंपरा; 4600 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री लावला कीर्तीध्वज, जाणून घ्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा!
वणी येथील सप्तश्रृंगी गडावर कीर्तीध्वज सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली.
Follow us on

मनोज कुलकर्णी, नाशिकः नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर मानाचा ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. मध्यरात्री 4 हजार 600 फूट उंचीवरच्या सुळक्यावर दरेगावच्या पाटील यांनी कीर्तीध्वज लावला आणि भक्तांची पावले घराकडे वळली.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तश्रृंगी देवी. साडेतीन शक्तीपीठांना ॐ काराचे सगुण रूप मानतात. ओंकारात साडेतीन मात्रा आहेत. त्यातील ‘अ’कार पीठ म्हणून माहूर ओखले जाते. ‘उ’कार पीठ तुळजापूर, ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा म्हणजेच सप्तश्रृंगी. हे अर्धपीठ आहे. कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो. शुंभनिशुंभ व महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते. नवरात्रोत्सवात दरवर्षी सप्तश्रृंगी गडावर मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येतात. गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तश्रृंगी माता कुलदैवत आहे. प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिली. या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर तुम्ही पोहचलात की मन प्रसन्न होऊन जाते. यावर्षी कोरोनामुळे यात्रा भरली नसली तरी मंदिर चोवीस तास उघडे होते. भाविकांनी देवीचे दर्शन घेता आले. जिल्हा सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी गुरुवारी दुपारी ध्वजाची पूजा केली. तो ध्वज मानकरी असणाऱ्या गवळी परिवारांकडे दिला. त्यानंतर ढोल आणि ताशाच्या निनादात गावकऱ्यांनी गावातून जंगी मिरवणूक काढली. यावेळी गुलालाची उधळण झाली. कीर्तीध्वज लावण्यासाठीचे मानकरी हे दरेगावचे पाटील मध्यरात्री सुळक्यावर चढतात. समुद्रसपाटीपासून तब्बल 4 हजार 600 फूट इतक्या उंचीवर हा सुळका आहे. मग मध्यरात्री ध्वजकाठी, ध्वजदेवीचे पातळ, ध्वजदेवीचे नारळ असे पस्तीस किलो वजनाचे सामान यावेळी पाटलांजवळ असते. इतके ओझे घेऊन ते त्या सुळक्यावर कसे पोहचात, याचे कोडे अजूनही कुणालाही उलगडे नाही. गेल्या पाचशे वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, यावर्षीही ती पाळण्यात आली. हा सुळका चढणे आणि उतरण्यासाठी सात ते आठ तास लागतात. इथला ध्वज बदलला की, यात्रेची सांगता झाली, असा संकेत आहे. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री पाटील यांनी हा सुळका चढून तेथे ध्वज लावला. सकाळी सुळक्यावरचा ध्वज पाहून भाविक परतीच्या प्रवासाला निघाले.

खासगी वाहनांना प्रवेश नाही

नवरात्रोत्सवाच्या काळात तसेच कोजागरी पौर्णिमेलाही 18 आणि 19 ऑक्टोबरला खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये पन्नास टक्के प्रवासी बसवून वाहतूक सुरू राहील. नांदुरी येथील बुथवरून ऑनलाइन पास शक्य असेल तरच मिळेल. पायी दर्शन करण्यासाठी बारा ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडच्या नियमानुसार या काळात फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहणार आहे. त्यात फेनिक्यूलरमधील भाविकांना 30 टक्के तर पायरीचे दर्शन घेणाऱ्यांना भाविकांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.

इतर बातम्याः

Special report: घावली मुळमायेची मुळी, नारोशंकरांनी मागे पाहिले अन् माता गोदापात्रात थांबली; राजेबहाद्दरांच्या देवीची रोमहर्षक आख्यायिका!

दसऱ्यानिमित्त विशेष सोय: नाशिकमध्ये आज सुट्टी दिवशीही रजिस्ट्री, वाहन नोंदणी सुरू; ही कार्यालये आहेत उघडी!