AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special report: घावली मुळमायेची मुळी, नारोशंकरांनी मागे पाहिले अन् माता गोदापात्रात थांबली; राजेबहाद्दरांच्या देवीची रोमहर्षक आख्यायिका!

होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवितो रात्रंदिन संबळ, फुलवितो दिवटी दीप कळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी...

Special report: घावली मुळमायेची मुळी, नारोशंकरांनी मागे पाहिले अन् माता गोदापात्रात थांबली; राजेबहाद्दरांच्या देवीची रोमहर्षक आख्यायिका!
नाशिकमधील ऐतिहासिक राजेबहाद्दरांची अर्थात सांडव्यावरची देवी.
| Updated on: Oct 15, 2021 | 7:02 PM
Share

मनोज कुलकर्णी, नाशिकः नाशिकच्या ऐतिहासिक राजेबहाद्दरांच्या देवीची आख्यायिका मोठी रोमहर्षक आहे. आज शुक्रवारी दसऱ्यानिमित्त सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. गोदातीरावर असलेली ही अंबाबाई सांडव्यावरची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. जाणून घेऊया तिचे ऐतिहासिक वेगळेपण.

होऊ दे सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंदिन संबळ फुलवितो दिवटी दीप कळी आम्ही अंबेचे गोंधळी

घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो‌ भवानी भवानी, भवानी बसली ओठी गळी, अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी

सान थोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो‌ घावली, घावली, घावली मुळमायेची मुळी आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी…

हे गाणं सांडव्यावरच्या देवीसाठी अगदी लागू पडतं. असे म्हणतात की ही देवी सप्तशृंगी गडावर होती. मात्र, ती थेट नाशिकच्या गोदापात्रात आली. सध्याच्या राजेबहाद्दर यांचे पूर्वज नारोशंकर राजेबहाद्दर हे सप्तशृंगनिवासिनी देवीचे निस्सिम भक्त. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात. मात्र, त्यांचे वय वाढले. त्यांना त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले. आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना वाटायची. तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. अगदी कडक अनुष्ठान केले. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, ‘तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झाले. मी आता तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन. फक्त, माझी एक अट आहे. ती पाळावी लागेल. मी तुझ्या मागे येताना, तू मागे वळून पाहू नकोस. ही अट तू पाळली नाही. मागे मागे वळून पहिले, तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेन.’ नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि देवी त्यांच्या मागे निघाली. गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पहिले नाही. मात्र, पंचवटीत येताच त्यांच्या मनात शंकेची पाल कुचकुचली. खरेच देवी आपल्या मागे येतेय का? की आपल्याला काही भ्रम वगैरे झाला. या विचाराने म्हणका किंवा शंकेने ते अतिशय अस्वस्थ झाले. आणि शेवटी न राहून त्यांनी मागे वळून पाहिले. तर काय अठरा भुजा असणारी माता सप्तश्रृंगी माता त्यांच्या समोर उभी आहे. त्यांनी तिच्यासमोर लगेच लोंटागण घातले. मात्र, देवी म्हणाली, तू अट मोडली. आता मी येथेच थांबते. हा या दृष्टांताने नारोशंकर भरून पावले. त्यांनी त्याच जागेवर मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. आणि भव्य असे मंदिर उभारले. आजही नारोशंकराचीं पिढी या देवीची नित्य पूजाअर्चा करते. येथे सर्व सण मोठ्या दिमाखात साजरे केले जातात.

अन् दीपमाळ उजळून निघते

नाशिकमध्ये म्हणाल तर सप्तशृंगीनिवसिनीची पन्नासपेक्षा जास्त मंदिरे आहेत. यातील पंचवटीच्या गोदा काठावरील ‘सांडव्यावरची देवी’ किंवा ‘राजेबहाद्दरांची देवी’ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. नारोशंकर मंदिराला लागून असलेले हे मंदिर. ते थेट गोदापात्रात असल्याने गोदावरीच्या पुरात दर वर्षी न्हाऊन निघते. या देवी मंदिराच्या जवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला ‘सांडव्यावरची देवी’ म्हणतात. या मंदिरासाठी चंद्रकांत राजेबहाद्दर यांनी नवीन दीपमाळ बनवून घेतली. येथील दगडी दीपमाळ या देवीचे वेगळेपण. दर मंगळवार, शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही दीपमाळ दिवे लावून प्रज्वलित केली जाते.

अशी आहे भव्य मूर्ती

रात्रीच्या वेळी अनेक दिव्यांनी प्रकाशमान झालेली दीपमाळ गोदाकाठावरील सर्वांचे लक्ष वेधून घेते. येथील देवीची मूर्ती अगदी सप्तशृंगी गडावरील देवीसारखीच अतिशय भव्य आहे. याही देवीलाही अठरा हात आहेत. या हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून, जणू काही देवी भक्तजनांची गाऱ्हाणी एकत आहे असे वाटते.

चांदीचे मुकुट, सोन्याची नथ

सांडव्यावरच्या देवीला सोन्या-चांदीचे वेगवेगळे दागिने आहेत. येथे भाविक देवीला काहीना काही अर्पण करीतच असतात. त्यात देवीला तीन मोठाले चांदीचे मुकुट, सोन्याची नथ, कानात घालावयाची माशाच्या आकाराची कर्णफुले, पायात चांदीचे तोडे, गळ्यात सोन्याचा हार, चांदीच्या बांगड्या, बिंदी, कमरपट्टा इत्यादी दागिने आहेत. या दागिन्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे.

हत्तीवरून आणली घंटा

गोदापत्रातच सांडव्यावरच्या देवीच्या मंदिराशेजारी नारोशंकराचे मंदिर आहे. या मंदिरावरील मोठी घंटा हे नाशिकचे वेगळेपण समजले जाते. नाशिक महापालिकेच्या लोगोमध्येसुद्धा या घंटेचा समावेश करण्यात आला आहे. इसवी सन 1721 मध्ये ही घंटा दोन हत्तींवरून नाशिकला आणली. 2021 मध्ये या घंटेचा तीनशेवा वर्धापनदिन साजरा होत आहे. नारोशंकर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला पणत्या पेटवल्या जातात. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघतो. नाशिकच्या ऐतिहासिक वैभवात हे मंदिर, घंटा आणि आख्यायिका भर घालते हे मात्र नक्की.

इतर बातम्याः

दसऱ्यानिमित्त विशेष सोय: नाशिकमध्ये आज सुट्टी दिवशीही रजिस्ट्री, वाहन नोंदणी सुरू; ही कार्यालये आहेत उघडी!

नाशिककरांना भारनियमनापासून तूर्तास दिलासा; एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक संच सुरू

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.