फॅटी लिव्हरपासून त्रस्त आहात, ही योगासने करा, मिळेल आराम
फॅटी लिव्हर हा आजार आजकाल तरुणामध्ये वेगाने वाढत आहे. याच्या सुरुवातीच्या टप्प्यात याची काळजी घेणे गरजेचे आहे. रामदेव बाबांनी काही फॅटी लिव्हरला कंट्रोल करणारी काही आसने सांगितली आहेत.कोणती ते पाहूयात...

आजच्या काळात फॅटी लिव्हरची समस्या वेगाने वाढत आहेत. खास बाब म्हणजे फॅटी लिव्हरची समस्या बुजुर्गांऐवजी तरुणांमध्येच अधिक पाहायला मिळत आहे. वेळीच जर लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन लिव्हर इंफ्लेमेशन, फायब्रोसिस, सिरोसिसचा रुप धारण करु शकतो. यासाठी सुरुवातीला टप्प्यात याची देखभाल खूप गरजेची आहे.योगगुरु रामदेव बाबांनी काही आसनांच्या संदर्भात सांगितले आहे. जे लिव्हरची कार्यक्षमता वाढवणे आणि फॅटी लिव्हरला कंट्रोल करण्यात फायदेशीर असू शकतात. चला तर पाहूयात फॅटी लिव्हरची प्रमुख कारणे काय आहेत ?
फॅटी लिव्हर तेव्हा होतो जेव्हा लिव्हरच्या पेशीत फॅट जमा होण्यास सुरुवात होते. याच्या मागे अनेक कारणे असू शकतात. उदा. फिजिकली एक्टीव्हीटीची कमी, अधिक कॅलरी आणि तेलयुक्त भोजनाचे सेवन आणि दिवसभर बसण्याची सवय कारणीभूत असते. याशिवाय लठ्ठपणा, टाईप – २ डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल, इन्सुलिन रेजिस्टन्स आणि तणाव देखील याची जोखीम वाढवू शकतात. तरुणांत जंक फूड, नाईट लाईफ आणि खराब लाईफ स्टाईल याचा वेग आणखी जास्त करत आहे. वेळीच लाईफ स्टाईलमध्ये बदल करुन यास रोखता येते. चला तर जाणून घेऊयात फॅटी लिव्हरला सुधारण्याची कोण-कोणती आसने परिणामकारक आहेत.
फॅटी लिव्हरमध्ये योगासन आहेत असरदार
भुजंगासन
योगगुरु रामदेव यांच्या मते भुजंगासन पोटाच्या भागाला पसरवतो आणि लिव्हरच्या जवळ रक्तप्रवाह वाढवते. त्यामुळे येथे जमलेले फॅट कमी करण्यास मदत मिळते. आणि लिव्हर सेल्सना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळतो.हे आसन नियमित केल्याने पचन आणि मेटाबोलिझम देखील सुधारते.ज्यामुळे लिव्हर चांगल्या प्रकारे काम करते.
उष्ट्रासन
उष्ट्रासन छाती आणि पोटाला चांगल्या प्रकारे उघडते, ज्यामुळे लिव्हरच्या भागात दबाव आणि रक्तप्रवाह वाढतो. हे आसन पोटाची चरबी कमी करणे आणि पचन सुधारणे आणि लिव्हर डिटॉक्समध्ये मदत करते. हे तणाव कमी करण्यास देखील मदत करते.
कपालभाती प्राणायाम
कपालभाती एक वेगवान आणि प्रभावी श्वासाची क्रिया आहे. जी शरीरातील टॉक्सिन निघण्यासाठी मदत करते. ही मेटाबॉलिझमला वेगवान करते. या पोटाची चरबी घटवण्यास मदत करते. ज्यामुळे फॅटी लिव्हरच्या लक्षणात सुधारणा होते. तसेच हे लिव्हरला एनर्जी देखील प्रदान करते आणि त्याची कार्यक्षमता वाढवते.
लिव्हरच्या आरोग्यासाठी हे देखील गरजेचे
आहार हलका, कमी तेलाचा आणि संतुलित असावा
रोज किमान 30 मिनिटे वॉक किंवा एक्सरसाईज करा
शुगर आणि जंक फूड कमी करा
वजन नियंत्रणात ठेवा
मद्य/अल्कोहोलपासून दूर रहा, हे लिव्हरला वेगाने नुकसान पोहचवते
