AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत मोठा तणाव आहे, त्यामुळे सध्या संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईचा सामना करत आहे. मात्र याच दरम्यान भारतासाठी सात मोठ्या गुड न्यूज समोर आल्या आहेत.

Israel Iran War : संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज
PM MODIImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 14, 2026 | 9:08 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 15 दिवस आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज स्ट्रेट तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी बंद केलं आहे. त्यामुळे अनेक जहाज याच मार्गावर अडकून पडले आहे. यामुळे सध्या संपूर्ण जग इंधन टंचाईच्या मोठ्या संकटात सापडले आहे. एकीकडे संपूर्ण जग इंधन टंचाईच्या मोठ्या संकटात सापडलं असताना दुसरीकडे मात्र याचदरम्यान भारतासाठी सात सर्वात मोठ्या गुडन्यूज समोर आल्या आहेत. त्यातील पहिली गुड न्यूज म्हणजे शनिवारी भारताचे दोन सर्वात मोठे तेल वाहतूक करणारे दोन जहाजं शिवालिक आणि नंदादेवी यांनी होर्मुजची सामुद्रधुनी पार केली आहे. या जहाजांमध्ये तब्बल 92700 मेट्रिक टन एलपीजी गॅस असून हे जहाज आता भारताच्या दिशेनं येत आहेत. 16 -17 मार्च पर्यंत ही जहाजं भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.

आखाती क्षेत्रात अडकलेले सर्व भारतीय खलाशी सुरक्षित – दुसरी मोठी गुड न्यूज म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती क्षेत्रात अडकलेले सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत, याबद्दल शिपिंग मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये त्यांच्यासोबत कोणतीही दुर्घटना घडली नसून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली आहे.

253 खलाशी सुरक्षित भारतामध्ये परतले – याबाबत देखील राजेश सिन्हा यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 30 भारतीय खलाशांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आलं आहे. आता भारतात सुरक्षितरित्या परतलेल्या खलाशांची संख्या 253 वर पोहचल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ऊर्जा पुरवठा आणि नागरिकांच्या सुरक्षेवर भर – पत्रकार परिषदेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. वस्तू आणि ऊर्जेची वाहतूक विनाअडथळा कशी सुरू राहील याकडे आमचं विशेष लक्ष आहे. तसेच देशभरात युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुठेही इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

होर्मुज सामुद्रधुनीमधून जहाजांना जाण्याची परवानगी – पाचवी मोठी गुड न्यूज म्हणजे इराणने होर्मुज स्ट्रेटमधून जाण्यास भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे. या वृत्ताला भारतामधील इराणच्या दुतासावासाकडून देखील दुजोरा देण्यात आला आहे.

भारतात अडकलेले इराणी नागरिक सुरक्षितरित्या पाठवले – दरम्यान युद्ध सुरू झाल्यामुळे अनेक इराणी नागरिक भारतामध्ये अडकून पडले होते, त्यांच्यासाठी खास विमानाची व्यवस्था करण्यात आली, जे इराणी पर्यटक भारतामध्ये अडकून पडले होते, त्यांना पुन्हा एकदा इराणला पाठवण्यात आलं आहे.

1.72 लाख भारतीय नागरिकांची घरवापसी- युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले होते, त्यातील अनेक नागरिकांची सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यात आलं आहे.

Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...