AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा

स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी… थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा

| Updated on: Jul 30, 2026 | 5:37 PM
Share

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, यामुळे सभागृहात राडा झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्यांनी पंतप्रधानावर आरोप करत धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्या मागे वेगळंच कारण होतं असंही सांगितलं आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, यामुळे सभागृहात राडा झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्यांनी पंतप्रधानावर आरोप करत धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्या मागे वेगळंच कारण होतं असंही सांगितलं आहे. आज राज्यसभेत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात बोलताना सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी माजी मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं पंतप्रधान पद वाचवण्याचासाठी धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा घेतला

पुढे बोलताना खर्गे म्हणाले की, शिक्षणाचे वाढते खासगीकरण होत असल्याने दलित, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शिक्षण पुन्हा काही मोजक्या लोकांच्याच आवाक्यात जात आहे. सरकारच्या धोरणांमुळे वारंवार मनुस्मृतीत नमूद केलेल्या मनुवादी विचारसरणीची आठवण होते. खर्गे यांच्या या वक्तव्यादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला.पुढे अमति शाहांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली आहे.

 

Published on: Jul 30, 2026 05:37 PM

Follow Us