AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही, PM मोदींचा व्हिडिओ संदेशातून गंभीर इशारा

PM Modi New Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी देशातील परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही, PM मोदींचा व्हिडिओ संदेशातून गंभीर इशारा
PM Modi New VideoImage Credit source: Instagram
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 30, 2026 | 11:15 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी देशातील परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. पंतप्रधानांनी या व्हिडिओत सांगितले की, ‘संसदेने अलिकडेच असा कायदा मंजूर केला आहे, जो देशातील परीक्षा व्यवस्था अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’

PM मोदींनी काय म्हटले?

आपल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की,’विश्वासार्ह परीक्षा पद्धती निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने एकामागोमाग एक पावले उचलत आहोत. टास्क फोर्सची स्थापना, फास्ट ट्रॅक यंत्रणेची उभारणी आणि राज्यांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यात येत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून देशातील विविध राज्ये आणि केंद्र सरकारला पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

या गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून देशभरातील परीक्षा प्रणालीत व्यापक सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम करत परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही – PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितले की, परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करणे आता काळाची गरज बनली आहे. पेपर माफिया आणि पेपरफुटी करणाऱ्या टोळ्या देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. अशा कोणत्याही रॅकेटला सरकार अजिबात सोडणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि परीक्षा व्यवस्थेला भ्रष्ट करणाऱ्या प्रत्येक घटकावर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर पावले उचलली जातील, असेही पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर कायद्यांचीही आवश्यकता आहे. यासाठी आम्ही संसदेत विधेयक मांडले होते आणि मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार आज संसदेच्या दोन्ही सभागृहांनी कठोर तरतुदी असलेले हे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे विश्वासार्ह आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र, सुधारणा करण्याचे काम यापुढेही सातत्याने सुरू राहील.’

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा