US Midterm Election Result : जागतिक राजकारणातील महत्वाची घटना, अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी हार
US Midterm Election Result : अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना हार सहन करावी लागली आहे. हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्समध्ये डोनाल्ड ट्रम्प एक पाऊल मागे गेले आहेत.

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. रिपब्लिकन पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. डेमोक्रॅटिक पार्टीने अमेरिकी प्रतिनिधी सभेत (हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स) बहुमत मिळवलं आहे. रिपब्लिकन पार्टीची पिछेहाट झाली आहे. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य केला आहे. डेमोक्रॅट्स सोबत काम करायला तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “मी निवडणुकीच्या मैदानात नव्हतो, नाहीतर माझा पक्ष मोठ्या बहुमताने जिंकला असता” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्यांनी अमेरिकी मतदाराचे आभार मानले. एका अमेरिकन वृत्तवाहिनीवर बोलताना ट्रम्प यांनी निवडणूक निकाल मान्य केला. डेमोक्रॅट्ससोबत मिळून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. या निकालाबद्दल त्यांना काही एक पश्चाताप नाहीय
(बातमी अपडेट होत आहे)
