IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध अर्शदीपला जलवा, पण नमन कडून पुन्हा तीच मिस्टेक, ऋतुराजनं सुधरवली चूक, Video Viral
IND vs NZ 1st Odi Match: भारत न्यूझीलंड पहिल्या वनडे सामन्यात अर्शदीप सिंगने जबरदस्त कामगिरी केली पण नमन धीरने पुन्हा तीच चूक केली.

IND vs NZ ODI Match: ऑकलंडमधील ईडन पार्क येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या भेदक गोलंदाजीने कहर केला. आयपीएल २०२७ च्या रिटेन्शन डेडलाइनच्या अगदी आधी चर्चेत असलेल्या अर्शदीपने, आपल्या मैदानातील गोलंदाजीने हे सिद्ध केले आहे की त्याला सध्या भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा का मानले जाते. पण याचवेळी नमन धीरने मात्र पुन्हा तीच केली पण सुदैवाने ऋतुराज गायकवाडने ती चूक सुधारली.
ईडन पार्कच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत, अर्शदीप सिंगने भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले आणि आपल्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये किवी संघाला बॅकफूटवर ढकलले. अर्शदीपने आपल्या पहिल्या पाच षटकांत न्यूझीलंडच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले आणि ५.० च्या अत्यंत किफायतशीर इकॉनॉमी रेटने केवळ २५ धावा दिल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताला सामन्याच्या सुरुवातीपासूनच यजमानांवर दबाव आणता आला.
Naman Dhir dropped the catch of Tim Seifert on 7 🙄
#NZvsIND https://t.co/jnuxXMrOHZ
— Footvoski (@CRICBALLY) November 4, 2026
अर्शदीप सिंगचा पहिला बळी विल यंग होता, जो श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर त्याने डावाच्या ९व्या षटकात हेन्री निकोल्सला बाद केले. निकोल्सने अर्शदीप सिंगच्या एका आखूड चेंडूवर मिड-विकेटच्या दिशेने पुल शॉट खेळला, जिथे नमन धीरने कोणतीही चूक न करता सोपा झेल घेतला. पण याआधी त्याने एक मोठी चूक केली होती. आकिब नबीच्या चौथ्या षटकात नमन धीरने एक सोपा झोल सोडला. हे पाहून विराटही चकित झाला. यापूर्वी ही नमनने हीच चूक केली होती.
Tim Seifert Gone Brar taken wicket..🔥 #NZvsIND https://t.co/TF0UEgd427
— cricket Live (@Msdhoni1546796) November 4, 2026
आकिब नबीच्या चौथ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर नमन धीरने एक सोपा कॅच सोडला. एक सरळ हातात येणारा बॉल नमनला घेता आला नाही. त्याने कॅच ड्रॉप केल्यानंतर आकिब नबी देखील निराश झाला होता. तर विराट देखील चकित झाला होता. नशिबाने यावेळी नमनची चूक ऋतुराजने सुधरवली. टिम सिफर्टचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला अन् बदली खेळाडूच्या रुपात क्षेत्ररक्षणासाठी आलेल्या ऋतुराज गायकवाडने झेल घेतला. या झेल घेऊन त्यानं नमनची चूक झाकली.
