AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील महिला खासदाराच्या चापट मारली… श्यामकुमार बर्वेंनी दिले स्पष्टीकरण, नेमकं बसमध्ये काय घडलं?

दिल्लीमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलना दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये खासदार श्यामकुमार बर्वेंनी खासदार प्रतिभा धानोरकरांच्या चापट मारताना दिसत आहेत. यावर आता बर्वेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रातील महिला खासदाराच्या चापट मारली... श्यामकुमार बर्वेंनी दिले स्पष्टीकरण, नेमकं बसमध्ये काय घडलं?
Shyamkumar BarveImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 10:05 AM
Share

काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते बसमध्ये बसलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनादरम्यानचा आहे. या बसमध्ये काँग्रेसचे इतरही खासदार दिसत आहेत. दरम्यान, बसमध्ये श्यामकुमार बर्वे हे खासदार प्रतिभा धानोरकरांच्या चापट मारताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओने सर्वत्र खळबळ माजली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता श्यामकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

श्यामकुमार बर्वे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आम्ही दिल्लीमध्ये जेव्हा आंदोलन करत होतो. आपण पाहात आहात की सतत आंदोलन करत आहोत. त्या आंदोलनाला कुठे तरी गालबोट लावण्याकरिता हा फेक नरेटिव्ह त्यांनी उभा केला. एका महिलेला कुठे तरी बदनाम करण्यासाठी… ती महिला आमच्या छोट्या बहिणीसारखी आहे. धारोकर ताई आणि त्यात तो नारे लावतानाचा फोटो आहे. व्हिडीओमध्ये नारे लावत नव्हतो तर आमची काही तरी थट्ट सुरु होती. त्याच्यामध्ये मी चापट मारली आहे आणि आम्ही नेहमी सोबत असतो. त्याच्यामध्ये हा विषय खूप मोठा करायची गरज नाही. पण आमच्या विरोधकांनी ते खोटा इमेल करुन ते आमच्या पक्षाला पाठवले आहे. आता प्रदेशाध्यक्षांनी बाईट दिला आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व स्पष्टीकरण दिले आहे.

तक्रारीबद्दल बोलताना ते म्हणाले की…

पुढे ते म्हणाले की, तक्रार दाखल करण्यावर ते म्हणाले की, तक्रार दाखल करणाऱ्यांचे नाव माहितीये का तुम्हाला? बेनामी आहे तो मेल. नागपूर काँग्रेसच्या दोन्ही शहर अध्यक्षांसोबत माझे बोलणे झाले आहे. फेक इमेल केला आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याची चौकशी करायला लावणार आहे. तरे हे आमची बदनामी करणारा कोण व्यक्ती आहे? त्याने थेट इमेल करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

बसमध्ये नेमकं काय घडलं होतं?

बसमध्ये नेमकं काय घडलं? असा प्रश्न विचारताच बर्वे म्हणाले की, आम्ही गांभीर्याने आंदोलन करतो. तुम्ही आमचे व्हिडीओ बघा. धानोरकर ताईंचे व्हिडीओ बघा… वर्षाताईंचे व्हिडीओ बघा… त्या नारे देत नव्हत्या असं काही तरी आमच्यामध्ये चर्चा, थट्टा सुरु होती. त्यामध्ये केले ते कृत्य आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...