डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के, अमेरिकेच्या निवडणुकीत ज्याचा विचार केला नाही तेच घडतंय, थेट..
US Midterm Elections Result 2026 Live Updates : अमेरिकेतील 2026 च्या मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान झाले. मतमोजणीला सुरूवात झाली असून निकाल पुढे येत आहेत. यारम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठे दणके बसताना दिसत आहेत.

अमेरिकेतील 2026 च्या मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान झाले. काही राज्यातील मतमोजणी झाली असून निकाल पुढे आला. फ्लोरिडा आणि जॉर्जियामधून ऐतिहासिक निकाल समोर येत आहेत. मोक्रॅटिक उमेदवार कीशा लान्स बॉटम्स या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला गव्हर्नर बनतील. रिपब्लिकन काँग्रेसमन बायरन डोनाल्ड्स यांनी फ्लोरिडामधील गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे. भारतीय वंशांचे नेतेही या निवडणुकीत धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत. भारतीय लोकांबद्दल अनकेदा आग ओकताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. त्यांनी H1B व्हिसाचे नियम कडक केले. भारतीय लोक अमेरिकेत नोकरीसाठी येतात आणि इथेच स्थायिक होतात, असा आरोप वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातो. त्यातच या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच मोठा दणका बसताना दिसत आहे.
त्यातच या निवडणुकीच्या निकालादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धाडधाड धक्के बसताना दिसत आहेत. सर्व महत्वाच्या जागा त्यांच्या हातून जाताना दिसत आहेत. इराणसोबतच्या युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लोक नाराज असल्याचे सांगितले जात होते. आता प्रत्यक्षात निकालाहून हे दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या निकालावर बोलताना म्हटले की, मी स्वत निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो… जर मी असतो तर आम्ही प्रचंड बहुमताने विजयी झालो असतो… डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला जनतेने नाकारले आहे. अनपेक्षित निकाल लागल्याचे बघायला मिळतंय. आतापर्यंत आलेल्या निकालावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिलीच ही प्रतिक्रिया दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष या निवडणुकीत पिछाडीवर जाताना दिसत आहे. ट्रम्प अमेरिकन सिनेटमध्ये आपली स्थिती बळकट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. सिनेटमध्ये एकूण 100 जागा आहेत. येणारा निकाल पाहता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यानंतर काय निर्णय घेतातत हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
