भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 पूर्वी भारतीय हॉकी संघाच्या जर्सीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून निळ्या जर्सीत खेळणारा भारतीय संघ आता विश्वचषकात प्रामुख्याने भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. या निर्णयामुळे क्रीडाविश्वात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारताचे माजी कर्णधार विरेन रास्किन्हा यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मला हे सांगावेच लागेल की हॉकी इंडियाने भारतासाठी अनेक चांगली कामे केली आहेत, पण हा निर्णय लाजिरवाणा आहे. भारतीय संघाचा वारसा नेहमीच निळी जर्सी राहिली आहे. मी अनेक वर्षे अभिमानाने निळी जर्सी परिधान केली आहे. चाहत्यांनाही भारतीय संघाला निळ्या रंगात पाहायचे आहे. या केशरी (भगव्या) रंगामागे काय तर्क आहे?”
दरम्यान, जर्सीवरील चर्चांदरम्यान भारतीय संघ विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांच्या मार्गदर्शनाखाली संघ तंदुरुस्ती, रणनीती आणि मानसिक तयारीवर भर देत आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली नुकतेच स्वित्झर्लंडमध्ये विशेष प्रशिक्षण शिबिरही पार पडले. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 मध्ये दमदार कामगिरी करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे.
Published on: Jul 30, 2026 05:55 PM
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....