AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता

Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता

| Updated on: Jul 30, 2026 | 5:50 PM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

हे प्रकरण जून 2023 मधील असून, वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या (ठाकरे गट) शाखेवर झालेल्या कारवाईनंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी पालिकेच्या ‘एच-पूर्व’ विभागातील सहाय्यक अभियंता अजय पाटील यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणात आमदार अनिल परब, माजी नगरसेवक सदानंद परब आणि इतरांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि धमकी देणे या आरोपांखाली वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून अनिल परब, सदानंद परब आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून, या निकालाची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 30, 2026 05:50 PM

Follow Us