केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोकरोच जनता पार्टी (CJP) ने केलेल्या आंदोलनानंतर आता या प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आता CJP ने आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर हालचाली वाढल्या आहेत. सीजेपीने हे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचंही सांगितल्याची चर्चा आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय गृहसचिव आणि आयबी प्रमुखांची संसद परिसरात महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत आंदोलनाशी संबंधित घडामोडींवर चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 30, 2026 04:58 PM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर