दसऱ्यानिमित्त विशेष सोय: नाशिकमध्ये आज सुट्टी दिवशीही रजिस्ट्री, वाहन नोंदणी सुरू; ही कार्यालये आहेत उघडी!

सरकारी कार्यालयांना आज सुट्टी असूनही दस्त नोंदणीसाठी सह दुय्यम निबंधक कार्यालय आणि नवीन वाहन नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.

दसऱ्यानिमित्त विशेष सोय: नाशिकमध्ये आज सुट्टी दिवशीही रजिस्ट्री, वाहन नोंदणी सुरू; ही कार्यालये आहेत उघडी!
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 10:37 AM

नाशिकः दसऱ्याने बाजारपेठेत उत्साह, आनंद आणि भरभरून ग्राहकी आणली आहे. त्यामुळे व्यापारी बांधवासह सारेच खुशीत आहेत. हे चैतन्य असेच सळसळत रहावे म्हणून ग्राहकांसाठी प्रशासनाने विशेष सोय केली आहे. त्यानुसार सरकारी कार्यालयांना आज सुट्टी असूनही दस्त नोंदणीसाठी सह दुय्यम निबंधक कार्यालय आणि नवीन वाहन नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.

दसरा सणानिमित्त अनेक नागरिक व्यवहारांच्या दस्त नोंदणीसाठी प्राधान्य देत असतात. त्या अनुषंगाने या कार्यालयाच्या अधिनस्त असलेली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सह दुय्यम निबंधक वर्ग -2 मधील नाशिक क्रमांक 1, 2 व 7 ही तीन कार्यालये आज शुक्रवार 15 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू राहणार आहेत. तर शनिवार 16 ऑक्टोबर 2021 रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग -2 मधील नाशिक क्र. 6 व 4 ही दोन कार्यालये सुरू राहणार आहेत. या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केले आहे. दरम्यान, दुसरीकडे दसरा सणानिमित्त नवीन वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. आजच्या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी होणे, नवीन क्रमांकासह ग्राहकास वाहनाचा ताबा मिळणे व शासकीय महसूल जमा होणे यासाठी आज सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू रहाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी कळविले आहे. नागरिकांनी नवीन वाहन खरेदी केले असल्यास त्याच्या नोंदणीची कार्यवाही आज करून घ्यावी, असे आवहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे.

कोट्यवधींची उलाढाल होणार दसऱ्या निमित्त बांधकाम क्षेत्र आणि वाहन उद्योगात आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेले दोन वर्ष कोरोनाने या दोन्ही क्षेत्रावर निराशेचे मळभ साचले होते. इतक्या दिवस कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू होती. मात्र, आता शाळा आणि कॉलेजही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कोरोनाच्या लसीकरणाने राज्यात वेग घेतला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने घटत आहे. हे पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता तूर्तास तरी मावळली आहे. त्यामुळे अनेक जण गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात या महिन्यात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी दसऱ्यानिमित्त विविध ऑफर आणल्या आहेत. त्याचा लाभ ग्राहक घेत आहेत. शिवाय वाहन खरेदीसाठीही वेगवेगळ्या कंपन्यांनी ऑफर आणल्या आहेत. त्याचा लाभही ग्राहक घेत आहेत. त्यामुळे आजच्या दिवशीही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

दसऱ्यानिमित्त रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल होते. त्यामुळे शुक्रवार 15 ऑक्टोबर 2021 रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सह दुय्यम निबंधक वर्ग -2 मधील नाशिक क्रमांक 1, 2 व 7 ही तीन कार्यालये व शनिवार 16 ऑक्टोबर 2021 रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग -2 मधील नाशिक क्र. 6 व 4 ही दोन कार्यालये सुरू राहणार आहेत. – कैलास दवंगे, नाशिक सह जिल्हा निबंधक वर्ग-1

दसऱ्याच्या सणानिमित्त अनेक ग्राहक नवीन वाहनांची खरेदी करतात. या वाहनांची नोंदणी होणे, नवीन क्रमांकासह ग्राहकास वाहनाचा ताबा मिळणे व शासकीय महसूल जमा होणे यासाठी आज सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू रहाणार आहे. – प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

इतर बातम्याः

नाशिककरांना भारनियमनापासून तूर्तास दिलासा; एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक संच सुरू

मान्सून महाराष्ट्राच्या वेशीबाहेर, तरीही नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज; म्हणे 19 तारखेलाही झोडपणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.