नाशिककरांना भारनियमनापासून तूर्तास दिलासा; एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक संच सुरू

महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांना येत्या काही महिन्यांत विजेची कमतरता भासू शकते. सरासरी, बहुतेक वीज केंद्रांमध्ये फक्त 3 ते 4 दिवसांचा कोळसा आहे.

नाशिककरांना भारनियमनापासून तूर्तास दिलासा; एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक संच सुरू
नाशिक येथील एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प.


नाशिकः नाशिकला भारनियमनापासून तूर्तास दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. कारण नाशिकच्या एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील दौन पैकी एक संच सध्या तरी सुरू आहे.

चीन आणि लेबनॉनला गेल्या काही दिवासांमध्ये विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागले. आता दसरा दिवाळीच्या तोंडावर दिल्ली, पंजाब, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे. देशाच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे कोळशाची वाहतूक प्रभावित झाली आहे. आयात केलेल्या कोळशाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्याने आयात केलेल्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रे त्यांच्या क्षमतेच्या निम्म्याहून कमी उत्पादन करत आहेत. या दोन कारणांमुळे वीजनिर्मिती क्षेत्र दुहेरी संकटात सापडला आहे. देशात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, अतिवृष्टीमुळे कोळशाच्या खाणींपासून वीजनिर्मिती युनिटपर्यंत इंधनाच्या वाहतुकीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. कोळशाच्या संकटामुळे पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्येही वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील परळी येथील वीज निर्मिती केंद्रावर देखील प्रभाव पडला आहे.

देशभरातील प्रमुख कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रांमधील संयत्र निम्म्याहून कमी क्षमतेनं उर्जानिर्मिती करत आहेत. यामुळे दिल्लीप्रमाणेच, महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांनाही येत्या काही महिन्यांत विजेची कमतरता भासू शकते. सरासरी, बहुतेक वीज केंद्रांमध्ये फक्त 3 ते 4 दिवसांचा कोळसा आहे. हे सरकारी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कमी साठा आहे. नियमानुसार किमान 2 आठवड्यांचा कोळसा साठा शिल्लक असावा लागतो. भारताच्या वीजनिर्मितीमध्ये कोळशाचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक आहे.

भारनियमन झाल्यास नाशिकच्या उद्योगांना जबर फटका बसू शकतो. त्यातही स्टील उद्योग आणि शीतगृहांना मोठा फटका बसणार आहे. कारण या दोन्ही उद्योगांचा कच्चा माल वीज आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात जवळपास दहा स्टील प्रकल्प आहेत. शीतगृहांचे प्रमाणही मोठे आहे. नाशिकला एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातून वीजपुरवठा केला जातो. या प्रकल्पातील दौन पैकी एक संच सध्या तरी सुरू आहे. त्यामुळे नाशिककरांना तूर्तास तरी भारनियमनाच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर बातम्याः

500 रुपयांच्या 291 बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; नाशिकच्या हायप्रोफाइल टोळीत चक्क महिला डॉक्टर!

कोर्टाच्या आवारात पोलिसांना धक्काबुक्की, वकिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; नाशिकमध्ये पार्किंगच्या जागेवरून घातली हुज्जत

धक्कादायकः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे रेल्वे कर्मचाऱ्याची सचखंड एक्स्प्रेसखाली आत्महत्या; 16 जणांवर गुन्हा दाखल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI