AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायकः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे रेल्वे कर्मचाऱ्याची सचखंड एक्स्प्रेसखाली आत्महत्या; 16 जणांवर गुन्हा दाखल

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून रेल्वेत किमॅन म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने धावत्या सचखंड एक्स्प्रेससमोर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायकः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे रेल्वे कर्मचाऱ्याची सचखंड एक्स्प्रेसखाली आत्महत्या; 16 जणांवर गुन्हा दाखल
भाऊसाहेब गायकवाड
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 1:42 PM
Share

नाशिकः वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून रेल्वेत किमॅन म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने धावत्या सचखंड एक्स्प्रेससमोर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब गायकवाड असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या प्रकरणी अधिकाऱ्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा हादरवून सोडणाऱ्या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड हे रेल्वेत किमॅन म्हणून नोकरी करायचे. ते येवला तालुक्यातल्या गारखेडचे रहिवासी होते. त्यांनी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता तळवाडे शिवारात नगरसोल आणि तारूर रेल्वे स्थानकादरम्यान सचखंड एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ काही चिठ्ठ्या सापडल्या होत्या. त्यामध्ये रेल्वे प्रशासनातील 16 अधिकारी-कर्मचारी आपल्याला त्रास देत असल्याचे लिहिले होते. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्रास आपल्याला असह्य झाला आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेखही होता. या चिठ्ठ्यांच्या आधारे रेल्वे कर्मचारी गायकवाड यांची मुलगी मंगल गायकवाड यांनी येवला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी रेल्वे अधिकारी कैलासदास, बिनोद शर्मा, काळूराम मिणा, गुंजाळ बाबुजी, नवलकिशोर मिणा, आशिष सोनवणे, जयप्रकाश बोधक, मुसा सय्यद, भीमा दिवे, शैलजा, राजू मोकळे, राजू नामदेव, संतोष मेट, फुलसिंग प्रजापती, किशोर आचेया आणि सुनील सूर्यभाव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

हेल्पलाइन सुरू करावी

रेल्वेत अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करत असल्याचे प्रकार घडत आहेत. फक्त नोकरी आणि प्रमोशनमुळे अनेक कर्मचारी याची कुठेही वाच्यता करत नाहीत. मात्र, त्रासाचा कडेलोट झाल्यामुळे साध्या किमॅन पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क नावासह पत्र लिहून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास यात अनेक कर्मचारी आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडतीलही. मात्र, अशी व्यवस्था मोडून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वतःहून पाऊल उचलावे. अशा छळाविरोधात तक्रार करण्यासाठी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष विभाग किंवा हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून पुढे येत आहे.

 इतर बातम्याः

500 रुपयांच्या 291 बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; नाशिकच्या हायप्रोफाइल टोळीत चक्क महिला डॉक्टर!

कोर्टाच्या आवारात पोलिसांना धक्काबुक्की, वकिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; नाशिकमध्ये पार्किंगच्या जागेवरून घातली हुज्जत

बनावट दारूचा दुसरा कारखाना उद्धवस्त; नाशिकमध्ये एकूण दीड कोटीचा ऐवज जप्त, सूत्रधार राजकीय पक्षाचा पदाधिकारी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.