AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बनावट दारूचा दुसरा कारखाना उद्धवस्त; नाशिकमध्ये एकूण दीड कोटीचा ऐवज जप्त, सूत्रधार राजकीय पक्षाचा पदाधिकारी

नाशिक जिल्ह्यातल्या सायखेडा परिसरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. अवघ्या 24 तासांत हा दुसरा कारखाना सापडल्याने ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

बनावट दारूचा दुसरा कारखाना उद्धवस्त;  नाशिकमध्ये एकूण दीड कोटीचा ऐवज जप्त, सूत्रधार राजकीय पक्षाचा पदाधिकारी
नाशिक ग्रामीण पोलिसांनी बनावट दारूचा दुसरा कारखाना उद्धवस्त केला.
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 11:28 AM
Share

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या सायखेडा परिसरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. अवघ्या 24 तासांत हा दुसरा कारखाना सापडल्याने ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हे कारखाने संजय दाते याचे असल्याचे समोर येत असून, तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समजते.

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चक्क मंगल कार्यालयात बनावट दारूचा कारखाना असल्याचे उघड झाले होते. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स आहे. यावर अवैध देशी दारू तयार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने 11 ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. यावेळी संजय मल्हारी दाते वय वर्ष 47 राहणार गोंदेगाव तालुका निफाड हा तिथे सापडला. हा त्याचाच कारखान असून, येथून बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लिटर स्पिरिट, दोनशे लीटर चे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे पाच हजार ते 10 हजार, देशी दारू बनवण्याचे साहित्य 5 पाण्याच्या टाक्या, एक मालट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी या दातेच्या मालकीच्या सायखेड्यातील दुसऱ्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकला. तिथे बनावट दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे तब्बल 50 लाखांचे रसायन सापडले.

आठ जणांना बेड्या

दुसऱ्या कारवाईत संजय मल्हारी दातेसह (रा. गोंदेगाव, ता. निफाड) अंबादास खरात (रा. चांदोरी), शुभम शिंदे, सुरेश देवरे, दीपक पाटील (सर्व रा. धुळे), पंकजकुमार मंडल, मनिकांतकुमार मंडल (रा. बिहार) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही कारवाईत मिळून पोलिसांना दीड कोटीचा ऐवज सापडला आहे.

परराज्यात माल पाठवायचे

बनावट दारूच्या कारखान्यात सरकारमान्य दारूच्या बाटल्याची हुबेहुब नकल केली जायची. तसेच सरकारमान्य कंपनीचे स्टीकर, कंपनीचे नाव या बाटल्यांवर असायचे. हा माल गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, बिहार येथे पाठवला जायचा. विशेष म्हणजे ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला याचा थांगपत्ताही नव्हता, याबद्दल विशेष चर्चा सुरू आहे.

दाते शिवसेनेचा कथित पदाधिकारी

पोलिसांनी छापे टाकलेले दोन्ही कारखाने दातेचे असल्याचे समोर येत आहे. दाते हा सत्ताधारी शिववसेनेचा कथित पदाधिकारी आहे. तो माजी आमदाराचा कार्यकर्ता आहे. या राजकीय लागेबांध्याचा वापर करूनच त्याने उघडपणे हे कारखाने थाटण्याचे धाडस केल्याचे समजते. विशेष म्हणजे दातेशी संबंध असणारा राजकीय नेता निफाड तालुक्यातील अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये होता. दातेच्या कारखान्यावर कारवाई होताच त्या नेत्याने हे ग्रुप सोडल्याचे समजते.

इतर बातम्याः

परमबीरांच्या बेनामी मालमत्तेच्या सुरस कथा; पुनमियाच्या बनावट उताऱ्याला सरकारी कचेरीतून फुटले पाय, संशयाचे धुके गडद

मालमत्तेचा मालकी हक्क निश्चिती अन् चौकशीचे काम सुरू; नाशिक महापालिकेचा पुढाकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.