सीरममध्ये लागलेल्या आगीत अकोल्याच्या तरुणाचा होरपळून मृत्यू, कुटुंबावर शोककळा

| Updated on: Jan 23, 2021 | 12:53 PM

या भीषण आगीमध्ये अकोला ( चांदुर बाजार ) इथला महेंद्र हा नवीन बिल्डिंगच्या मेंटन्ससाठी आपल्या कंपनीकडून गेला होता. लागलेल्या आगीत त्याचा मृत्यु झाला आहे.

सीरममध्ये लागलेल्या आगीत अकोल्याच्या तरुणाचा होरपळून मृत्यू, कुटुंबावर शोककळा
Follow us on

अकोला : कोरोनाची लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. लस निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस तयार होत आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या भीषण आगीमध्ये अकोला ( चांदुर बाजार ) इथला महेंद्र हा नवीन बिल्डिंगच्या मेंटन्ससाठी आपल्या कंपनीकडून गेला होता. लागलेल्या आगीत त्याचा मृत्यु झाला आहे. त्याचा मृतदेह आज चांदुर इथं येणार असून त्याच्यावर अकोल्यातील चांदुर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महेंद्र यांच्या मृत्यूमुळे चांदुर परिसरात शोककळा पसरली आहे. (A young man from Akola died in a fire in Serum institute pune)

महेंद्र हा मूळ अकोल्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चांदुर इथला असून प्राथमिक शिक्षण हे चांदुर इथं करून पॉलिटेक्निक वाशीमधून केलं. त्यानंतर नागपूरला इंजिनिअर पदवी मिळवून गेल्या सहा वर्षांपूर्वी तो पुण्यात ऐका कंपनीमध्ये कामाला लागला होता. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असल्याने त्याला कंपनीकडून मेंटेनन्ससाठी पाठवलं जात आहे. सीरम इथेही तो याच कामासाठी गेला होता. पण आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांच्या मागे पत्नी आई-वडील, भाऊ-बहीण असा बराच आप्त परिवार आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही

जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.

बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमारास आग लागली. दोन वाजून 37 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीची माहिती मिळाली. जवानांकडून तिघा कामगारांची सुटका करण्यात आली, तर अनेक कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. (A young man from Akola died in a fire in Serum institute pune)

संबंधित बातम्या – 

सीरमची आग अपघात की घातपात?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Serum institute Fire : आधी मुक्ता टिळक म्हणाल्या घातपाताचा संशय, आता प्रकाश आंबेडकर म्हणतात आग लागली की लावली?

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग 

Serum Institute Fire : सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका, भाजप आमदाराकडून संशय व्यक्त 

(A young man from Akola died in a fire in Serum institute pune)