AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीरमची आग अपघात की घातपात?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

सीरमच्या आगीची घटना हा अपघातच असावा, असं म्हणत घातपाताचा संशय शरद पवारांनी फेटाळून लावला. 

सीरमची आग अपघात की घातपात?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 22, 2021 | 10:44 AM
Share

कोल्हापूर :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला गुरुवारी आग लागली होती. काही तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. मात्र आगीनंतर अनेकांनी ही आग लावली की लागली?, अशा संशयास्पद कमेंट व्यक्त केल्या. यामध्ये राजकीय पक्षांचे नेतेही पाठीमागे नव्हते. सीरमच्या आगीवरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी आगीच्या घातपाताची शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. (NCp Sharad pawar on Serum Institute Fire pune)

सीरमच्या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी उपस्थित केला. मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही हीच शंका व्यक्त केली. त्यानंतर अनेकांनी घातपातीची शक्यता दबक्या आवाजात व्यक्त केली.

मात्र या सगळ्या चर्चा केवळ चर्चाच आहेत. यामध्ये तथ्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे पवारांनी सांगितलं. सीरम इन्सिट्यूटच्या स्टाफवर माझा संपूर्णपणे विश्वास आहे. आगीची घटना हा अपघातच असावा, असं म्हणत घातपाताचा संशय शरद पवारांनी फेटाळून लावला.

घातपाताची शक्यता- आ. मुक्ता टिळक

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही आघपात तर नाही ना, अशी शंका भाजपच्या आमदार मुक्ता टिकळ यांनी व्यक्त केली होती. कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. त्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा इमारतीलाच ही आग लागल्यानं हा घातपात तर नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.

आग लागली की लावली?, चौकशी झाली पाहिजे- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यानच त्यांना सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत माहिती मिळाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे”

(NCp Sharad pawar on Serun Institute Fire pune)

हे ही वाचा

Serum institute Fire : आधी मुक्ता टिळक म्हणाल्या घातपाताचा संशय, आता प्रकाश आंबेडकर म्हणतात आग लागली की लावली?

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग 

Serum Institute Fire : सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका, भाजप आमदाराकडून संशय व्यक्त 

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप