Serum institute Fire : आधी मुक्ता टिळक म्हणाल्या घातपाताचा संशय, आता प्रकाश आंबेडकर म्हणतात आग लागली की लावली?

Serum institute Fire : आधी मुक्ता टिळक म्हणाल्या घातपाताचा संशय, आता प्रकाश आंबेडकर म्हणतात आग लागली की लावली?
मुक्ता टिळक, प्रकाश आंबेडकर

Pune serum institute fire : मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही हीच शंका व्यक्त केली आहे.

सचिन पाटील

|

Jan 21, 2021 | 4:28 PM

मुंबई : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या (Pune Serum institute Fire) नव्या इमारतीला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. जवळपास दोन तासांपासून ही आग धुमसत आहे. सुदैवाने या इमारतीत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचं (Covishield vaccine) काम चालत नव्हतं. कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली आहे. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी उपस्थित केला. मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही हीच शंका व्यक्त केली आहे. (After BJP MLA Mukta Tilak, Prakash Ambedkar also raised question on Pune serum institute fire)

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यानच त्यांना सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत माहिती मिळाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे”

त्याआधी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबात घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

मुक्ता टिळक काय म्हणाल्या?

“दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, अशी माहिती भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.

VIDEO – सीरम इन्स्टिट्यूट आगीचा व्हिडीओ

संबंधित बातम्या 

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग 

Serum Institute Fire : सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका, भाजप आमदाराकडून संशय व्यक्त 

(After BJP MLA Mukta Tilak, Prakash Ambedkar also raised question on Pune serum institute fire)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें