अभिजीत दिपके दिल्लीहून परतणार? आईचा मोठा दावा, हिंगोलीला..

अभिजीत दिपके दिल्लीत असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यातच अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दिपके यांच्या आईने आता नुकताच मोठा खुलासा केला.

अभिजीत दिपके दिल्लीहून परतणार? आईचा मोठा दावा, हिंगोलीला..
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 10, 2026 | 4:17 PM

सीजेपीचे आंदोलन आज दिल्लीत होते. त्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली. थेट अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईहून दिल्लीपर्यंत पोलिसांनी अभिजीत दिपके यांची कोणतीही अडवणूक केली नाही. मात्र, दिल्ली विमानतळावर उतरताच त्यांनी ताब्यात घेतले. अभिजीत दिपके इकडे दिल्लीत पोहोचले आणि दुसरीकडे त्यांच्या आजीने जगाची निरोप घेतला. अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई दिपके याचं हिंगोलीच्या संतुक पिंपरी येथील मूळ गावी निधन झाले. अभिजीत दिपके यांचे आई वडील छत्रपती संभाजीनगरवरून हिंगोलीकडे वाहनाने रवाना झाले. यादरम्यान अभिजीत दिपके दिल्लीतून हिंगोलीकडे येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सावित्रीबाई दिपके यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुलगा भगवान दिपके आणि सून अनिता दिपके हिंगोलीकडे रवाना झाले. एकीकडे लेकाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असताना दिपके कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उद्या सकाळी 10 वाजता संतुक पिंपरी येथील मूळ गावी सावित्रीबाई यांच्यावर करण्यात येणार आहेत अंत्यसंस्कार.

Loading...

अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके आईच्या निधनानंतर भावूक झाले. सासूबाईच्या जाण्याने अभिजीत दिपके यांच्या आई अनिता दीपके यांना अश्रू अनावर झाले. अभिजीत दिपके यांचे वडील यांनी म्हटले की, आम्ही दुखात आहोत.  उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होतील. यादरम्यान अभिजीत दिपके यांच्या आईनेही भाष्य केले. सासूच्या निधनानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.

अभिजीत दिपके याच्या आईने म्हटले की, अभिजीत दिपके यांच्या मित्राला निरोप दिला आहे, तो उद्या नक्की येईल.   त्याला सांगितले आहे की, आपली माय गेली, आजीला अभिजीतच कौतुक होतं ती त्याला कवटाळून घ्यायची. ते अभिजीतला म्हणायची बाबासाहेबांनंतर तू नाव केलंस.. आता दिल्लीतून अभिजीत दिपके हिंगोलीला जाणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पोलिस ताब्यात घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us